विवाहितेचा छळप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 16:16 IST2019-04-24T16:15:05+5:302019-04-24T16:16:17+5:30
घरगुती कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

विवाहितेचा छळप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा
पिंपरी : घरगुती कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती योगेश हनुमंत काळे (वय ३२), सासू वैजयंता हनुमंत काळे (वय ५५), दीर दिपक काळे (वय ३४), नणंद धनश्री संजय होडगर (वय ४२), ज्योती बाळासाहेब ठोंबरे (वय ३४), संपदा अप्पासाहेब शेंडगे (वय ३२, रा. सांगोला, जि. सोलापूर), मावस दीर पोपट माणिकराव लोखंडे (वय ४२), शिवाजी माणिकराव लोखंडे (वय ४८), मावस जाऊ अश्विनी पोपट लोखंडे (वय ४५, रा. निगडी, पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती कारणावरुन आरोपी विवाहितेला वेळोवेळी त्रास देत. हाताने मारहाण करुन मारण्याची धमकी देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.