शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बँड, बाजा, बारात काढत डीजेवर थिरकणे नवरदेवाला पडले महागात; मोराची चिंचोली येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 19:06 IST

विनामास्क डीजेवर थिरकणे एका नवरदेवाला चांगलेच महागात पडले

ठळक मुद्देमास्क न लावल्याने गुन्हा दाखल 

शिरूर : शासनातर्फे अनलॉक सुरू करण्यात आले असले तरी त्यासाठीही नियम घालण्यात आले आहेत. मात्र, हे नियम डावलून बॅड, बाजा, वरात काढत विनामास्क डीजेवर थिरकणे एका नवरदेवाला चांगलेच महागात पडले. नवरदेवाचा व्हिडिओ व्हयरक झाल्यावर  नवरा-नवरीच्या आई-वडिलांस २० ते २५ वऱ्हाडी  मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे शनिवारी ही घटना घडली.

  मोराची चिंचोली येथे गुरूवारी (दि २५)  गणेश आप्पासाहेब थोपटे यांचे लग्न होते. कोरोनामुळे लग्नसमारंभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम आणि अटी घातल्या आहेत. लग्न समारंभात फक्त ५० लोकांंना  परवानगी दिली आहे. याशिवाय मास्क, सॅनिटायझर वापरायला सांगितले आहे. मात्र असे असताना या कुटुंबाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे तपासात पुढे आले आहे.  या लग्नात कोणीही मास्क वापरला नाही. कोणतेही वाद्य वाजवण्याची परवानगी घेतली नाही. असे असतानाही वरात काढत नवरदेवासह त्याची मित्रमंडळी डीजेवर थिरकली.

याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर शिरूर पोलिसांनी याची दखल घेत नवरा मुलगा व नवऱ्यामुलीचे आई वडील यांच्यासह २० ते २५ लोकांच्या विरोधात शिरुरपोलिसात शुक्रवारी (दि. २७) गुन्हा दाखल केला आहे. यापुढे लग्न समारंभ साजरा करताना होणारी कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन  शिरुर पोलिस निरीक्षक प्रविण खानापूरे यांनी केले आहे. याप्रकरणी पुढील तपास  पोलिस उपनिरीक्षक पालवे करित आहेत.

टॅग्स :Shirurशिरुरmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस