शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे सौदागर येथील ऑनर किलिंगप्रकरणी सहा जणांवर गुन्हा; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 14:34 IST

प्रेमप्रकरणातून काही जणांनी एका तरुणावर हल्ला करत त्याचा खून केला होता..

ठळक मुद्देसांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपरी : प्रेमप्रकरणातून काही जणांनी एका तरुणावर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. ७) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.विराज विलास जगताप (रा. पिंपळे सौदागर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, रोहीत जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे, अशी आरोपींची नावे आहेत. तर यातील आरोपी हेमंत काटे व सागर काटे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जितेश वसंत जगताप (वय ४४, रा. जगतापनगर, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमवारी (दि. ८) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पुतण्या विराज हा एका तरुणीवर प्रेम करीत होता. त्या कारणावरून आरोपी यांनी रविवारी (दि. ७) रात्री दहाच्या सुमारास जमाव जमवून छोट्या टेम्पोने विराज याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे विराज खाली पडला. त्यानंतर तो पळूज जात असताना आरोपी टेम्पोमधून उतरले. त्यांनी विराज याच्या डोक्यात लोखंडी रॉड व पाठीत दगड मारला. त्यानंतर जातीवाचक बोलले. तुझी लायकी आहे का मुलीवर प्रेम करायची, तरी तू प्रेम करतोस, असे म्हणून आरोपी त्याच्या अंगावर थुंकला. गंभीर जखमी झाल्याने विराज बेशुद्ध झाला. त्यानंतर उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखूनHonor Killingऑनर किलिंगPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी