शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र बर्‍हाटे सह १३ जणांवर रो हाऊस हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 13:34 IST

रवींद्र बर्‍हाटे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध आतापर्यंत ६ हून अधिक गुन्हे दाखल

ठळक मुद्दे रवींद्र बर्‍हाटे हे अजूनही फरार; सावकारी व अनुसुचित जाती जमातीखाली गुन्हा दाखल

सावकारी व अनुसुचित जाती जमातीखाली गुन्हा दाखललोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दमदाटी करुन मालमत्ता हडपसर केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे व त्यांच्या टोळीतील १३ जणांवर हडपसरपोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत. रवींद्र बर्‍हाटे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध आतापर्यंत ६ हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रवींद्र बर्‍हाटे शैलेश जगताप, विशाल ढोरे, विनोद ढोरे, अस्लम पठाण, सुजितसिंह, बालाजी लोखंडे, सचिन धीवार, विठ्ठल रेड्डी, परवेश जमादार, देवेंद्र जैन, गणेश आमंदे, नितीन रामदास पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रवींद्र बर्‍हाटे हे अजूनही फरार आहेत. याप्रकरणी सुमंत रंगनाथ देठे (वय ५८, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी अधि़ ३९, ४५ आणि अनु़ जाती व अनु़ जमाती कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देठे यांचा मांजरी ग्रीन येथे बंगला असून त्यांचे एक हॉटेल आहे. हा सर्व प्रकार जून २०१७ ते जून २०२० दरम्यान घडला आहे.  फिर्यादी यांच्यावर एका फायनान्स कंपनीचे ८० लाख रुपयांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी फायनान्स कंपनीकडून तगादा लावला जात होता.  आरोपींनी देठे यांचा मांजरी ग्रीनमधील रो हाऊस जबरदस्तीने हडपण्यासाठी कट रचला. आरोपींनी त्यांना २५ लाख रुपये महिना ५ टक्के व्याजाने कर्ज दिले. त्यांनी त्यातील आतापर्यंत सव्वा अकरा लाख रुपये परत केले. तसेच त्यांच्या हॉटेलवर निवडणुक काळात त्यांनी जेवण वगैरे करुन ४ ते ५ लाख रुपयांचे बील केले. कर्जाची वसुल करण्यासाठी त्यांनी फिर्यादीस उपद्रव देणे सुरु केले. त्यांची मालमत्ता जबरदस्तीने त्यांचे नावावर करुन घेण्यासाठी फिर्यादी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तसेच ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी, त्यांची पत्नी यांचे फोटो, अंगठे व सह्या घेऊन मालमत्ता हडप करण्यासाठी बनावट दस्त तयार केला. त्यांचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करुन अपशब्द वापरुन शिवीगाळ केली व मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस