शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार, आरटीआय कार्यकर्ता, बडतर्फ पोलिसांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 18:59 IST

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्याबदल्यात २ कोटी रुपये व रास्ता पेठेतील जागा देण्याची खंडणी मागितल्याची बांधकाम व्यावसायिकाची तक्रार..

पुणे : मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा घेऊन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्याबदल्यात २ कोटी रुपये व रास्ता पेठेतील जागा देण्याची खंडणी मागितल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी पत्रकार, आरटीआय कार्यकर्ता,बडतर्फ पोलीस कर्मचारी आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश हरिभाऊ जगताप, पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन, आरटीआय कार्यकर्ते रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे, अमोल सतीश चव्हाण (सर्व रा. पुणे) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुधीर वसंत कर्नाटकी (वय ६४, रा. शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०१९ मध्ये घडला होता. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेने यापूर्वी जानेवारी महिन्यात सुधीर कर्नाटकी यांच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा व जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप केला असून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर कर्नाटकी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या महिलेने त्यांच्याशी असलेल्या संबंधाचा गैरफायदा घेतला. ही महिला व सुधीर कर्नाटकी यांच्या संयुक्त नावाने असलेला बावधन येथील फ्लॅट या महिलेने जबरदस्तीने स्वत:च्या नावावर करुन घेतला. माझी सुपारी देऊन मारण्याची धमकी दिल्याने मी घाबरुन फ्लॅट नावावर करुन दिला. त्यानंतर या महिलेने रवींद्र बराटे हे आरटीआय कार्यकर्ते असून त्यांचे राजकीय संबंध चांगले आहेत. शैलेश जगताप हा पोलीस असून त्यांचा चांगला वट आहे, कोणताही खोटानाटा गुन्हा दाखल करुन माझे जीवन उद्धवस्त करेल, अशी धमकी दिली. माझ्या इच्छेविरुद्ध करारनाम्याद्वारे खंडणी रुपाने फ्लॅट दिला. तसेच ८ हप्त्याने ६ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर त्यांनी तुम्हाला २ कोटी रुपये व रास्ता पेठेची जागाही द्यावी लागेल अशी धमकी दिली. देवेंद्र जैन अथवा शैलेश जगताप यांच्याशी बोलून घ्या ते रवींद्र बराटे यांच्याशी बोलतील, असे या महिलेने सांगितले. त्यानंतर वाटेत अमोल चव्हाण याने मॅडमने सांगितल्याप्रमाणे दोन कोटी रुपये द्यावे लागतील असे धमकावले. मी देवेंद्र जैन यांच्या विजय टॉकिज येथील ऑफिसमध्ये जाऊन भेटलो. त्यांनी तुमच्या पार्टनरलाही बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू. रवींद्र बऱ्हाटे कोणाला भेटत नाही. तुझ्याविरुद्ध बलात्काराची बातमी माझे वेबपोर्टलवर छापून व व्हायरल करुन तुझे जगणे मुश्लिक करु शकतो, असे धमकाविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.कर्नाटकी यांच्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलिसांनी ३८६, ३८८, ३८९, ५०६(२), १२० (ब), ३४ खाली गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल झालेल्या महिलेच्या वतीने अ‍ॅड. विजय ठोंबरे यांनी सांगितले की, माझ्या अशिलाच्या फिर्यादीवरुन हिंजवडी पोलिसांनी  सुधीर कर्नाटकी यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे़. बलात्काराचा गुन्हा काढून घेण्यासाठी त्यांनी हा खोटा गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीadvocateवकिलkothrudकोथरूड