शिवीगाळ व मारहाण करत दहशत माजविल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:31 IST2019-04-08T18:30:15+5:302019-04-08T18:31:44+5:30
लोकांना अडवून त्यांना शिवीगाळ व मारहाण करत दहशत माजविल्याचा प्रकार पिंपरीत घडला.

शिवीगाळ व मारहाण करत दहशत माजविल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
पिंपरी : रस्त्यावरील लोकांना अडवून त्यांना शिवीगाळ व मारहाण करत दहशत माजविल्याप्रकरणी चौघांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंचवड येथील टेल्को रोडवर घडली. प्रितम रमेश् राठोड (वय १८), शरद चव्हाण (वय २५), शशिकांत वाघ (वय २१, सर्व रा. गल्ली नं. ५, शरदनगर, चिखली), मोन्या मोरे (वय २०, रा. गल्ली नं. ८, शरदनगर, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी राठोड व चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुहास पुरुषोत्तम देशमुख (वय ३६, रा. गिरणा हौसिंग सोसायटी, शाहुनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी टेल्को रोडवरील चौकात सामान्य नागरिकांना अडवित होते. दहशत माजविण्यासाठी ते नागरिकांना शिवीगाळ व मारहाण करत होते. दरम्यान, फिर्यादी देशमुख हे आरोपी चव्हाण याला पकडण्यासाठी गेले असता त्याने लोखंडी कोयता उगारुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी पळून जात असताना नागरिकांनी राठोड याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.