अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या तलाठी व कोतवालाला दमदाटी व शिवीगाळ,खेड तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 04:09 PM2020-07-27T16:09:38+5:302020-07-27T16:12:15+5:30

शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल.

Crime registred against 4 perosn for using unrespectful word to talathi and kotwal , Incident in Khed taluka | अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या तलाठी व कोतवालाला दमदाटी व शिवीगाळ,खेड तालुक्यातील घटना

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या तलाठी व कोतवालाला दमदाटी व शिवीगाळ,खेड तालुक्यातील घटना

Next
ठळक मुद्देखेड पोलीस ठाण्यात फिर्याद

राजगुरुनगर:  खरपुडी ( ता. खेड ) येथे विनापरवाना सुरू असलेले गौण खनिज उत्खनांची चोरी रोखण्यासाठी तलाठी व कोतवाल गेले असता त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी ४ जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत तलाठी स्वाती चंद्रकांत तावरे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की,खरपुडी (ता खेड )येथील मांडवळा येथे चासकमान धरणाचा डाव्या कालव्यालगत गट क्रमांक ४२४ या गटात बेकायदेशीरपणे विनापरवाना गौण खनिजाचे पोकलॅण्ड द्वारे उत्खनन करून गौन खानिजाची चोरी सुरू होती. याबाबत तलाठी तावरे यांना माहिती मिळाली होती.घटनास्थळी ही होणारी चोरी रोखण्यासाठी व पंचनामा करण्यासाठी तलाठी तावरे व कोतवाल दत्तात्रय छबू चव्हाण हे गेले होते. महेंद्र काळुराम भोगाडे ,श्रीधर दगडु चौधरी, प्रविण श्रीधर चौधरी,प्रसाद जालींदर चौधरी, हे सर्व (रा. खरपुडी बुद्रुक ,ता.खेड यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवुन विना परवाना गौण खनिजांची चोरी करत होते त्यांना पोकलॅण्ड बंद करण्यास सांगितले असता कोतवाल दत्तात्रय चव्हाण यांना ढकलुन दिले. तलाठी तावरे यांना शिवीगाळ दमदाटी केली पंचनामा करताना सरकारी कामकाजात अडथळा आणला. तसेच उत्खनासाठी वापरण्यात पोकलॅण्ड मशीन व डंपर जप्त न करुन देता दमदाटी करून तेथून हलविले. दरम्यान तावरे यांनी सदर जागेचा पंचनामा करत त्याठिकाणी माती, मुरुम व दगड या गौण खनिजाचे उत्खनन झाले असल्याचा अहवाल तहसीलदार सुचित्रा आमले यांना सादर केला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीसनिरीक्षक निलेश बडाख करत आहे.

Web Title: Crime registred against 4 perosn for using unrespectful word to talathi and kotwal , Incident in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.