शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘क्राइम पेट्रोल’च्या निर्मातीचीच झाली फसवणूक; ऑडी उधार घेत ठेवली गहाण, नेमकं काय घडलं? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 11:33 IST

मालाड पोलिसांनी गुरुवारी बॉलिवूड अभिनेता आणि लेखक झिशान कादरी याच्यावर “क्राइम पेट्रोल डायल १००” च्या निर्मातीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मुंबई :

मालाड पोलिसांनी गुरुवारी बॉलिवूड अभिनेता आणि लेखक झिशान कादरी याच्यावर “क्राइम पेट्रोल डायल १००” च्या निर्मातीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गँग्स ऑफ वासेपूरचे सह-लेखन करणाऱ्या अभिनेत्याने कथितपणे संबंधित निर्मातीची ३८ लाख किमतीची ऑडी कार उधार घेतली आणि एक वर्षापासून तिचे कॉल चुकवून ती १२ लाखांसाठी गहाण ठेवली असा त्यांच्यावर आरोप आहे. 

निर्माता राजबाला ढाका चौधरी (वय ४४) या मालाड येथे राहतात. त्यांचे दोन मुलगे समीर आणि साहिल व भावासोबत शालिनी प्रॉडक्शन नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांनी २०१७ मध्ये सोनी टेलिव्हिजनसाठी डायल १०० (गुन्हे मालिका) ही मालिका तयार केली. चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, २०१८ मध्ये त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी त्यांनी ऑडी कार खरेदी केली. चौधरी यांनी मालाड पोलिसांना सांगितले की, २०१८ मध्ये “डायल १००”च्या शूटिंगदरम्यान त्या कादरी आणि “फ्रायडे-टू-फ्रायडे एंटरटेनर्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड”चे मालक असलेल्या त्याच्या पत्नीला भेटल्या. चौधरी यांनी सांगितले की, तिने त्यांच्यासोबत क्राईम पेट्रोल मालिका आणि हलहल नावाच्या चित्रपटात काम केले, ज्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मालाड पोलिसांना दिलेल्या निवेदनात चौधरी यांनी सांगितले की, २२ जून २०२१ रोजी काद्री त्यांच्या घरी आला आणि त्यांचा मुलगा समीरला कॉमेडी शो तयार करण्याची ऑफर दिली, जी सब टीव्हीवर प्रसारित केली जाणार होती. त्यानंतर कादरीने चौधरी यांना शोच्या निर्मितीसाठी भागीदारीची ऑफर दिली. त्यांनी मालिकेची निर्मिती करत त्यासाठी वित्तपुरवठा करण्याची तयारी दर्शविली. 

फोन उचलला नाही, व्यस्त असल्याचा बहाणाशोबाबत तपशिलावर चर्चा केल्यानंतर  कादरीने चौधरी यांना सांगितले की, तो चॅनल प्रमुख, शो डायरेक्टर आणि कलाकारांसोबत अनेक बैठकांना उपस्थित राहणे आवश्यक आहे, ज्यासाठी त्याला कारची आवश्यकता असेल. “त्याने माझी ऑडी कार उधार मागितली आणि माझा त्याच्यावर विश्वास असल्याने  काही दिवसांसाठी ती देण्याचे कबूल केले. एक महिन्यानंतर चौधरी यांनी कादरीकडे गाडी परत मागितली. त्याला सतत फोनही केले. मात्र, तो फोन उचलत नव्हता आणि तो हायकोर्टात किंवा मीटिंगमध्ये व्यस्त असल्याचा बहाणा करू लागला. वर्षाहून अधिक काळ होऊनही त्याने कार परतवली नाही. नंतर कादरीने ती मैत्रिणीकडे १२ लाखांसाठी गहाण ठेवल्याचे चौधरींना समजले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी