बापरे! 2 बायकांची हौस पुरवताना नवऱ्याच्या नाकीनाऊ; पैशांसाठी केलं असं काही की बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 05:29 PM2021-10-29T17:29:21+5:302021-10-29T17:37:11+5:30

Crime News : दोन बायकांची हौस पुरवता पुरवता नवऱ्याच्या नाकीनाऊ आले आहेत. पैशांसाठी त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.

Crime News young man who had two wives could not fulfill his wish and became thief | बापरे! 2 बायकांची हौस पुरवताना नवऱ्याच्या नाकीनाऊ; पैशांसाठी केलं असं काही की बसेल धक्का

बापरे! 2 बायकांची हौस पुरवताना नवऱ्याच्या नाकीनाऊ; पैशांसाठी केलं असं काही की बसेल धक्का

Next

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही जण वाटेल ते करतात. आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमी झटत असतात. पण जर एका पत्नी ऐवजी दोन जणी असतील तर मात्र हे थोडं अवघड होऊन बसतं. अशीच एक घटना आता मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घडली आहे. दोन बायकांची हौस पुरवता पुरवता नवऱ्याच्या नाकीनाऊ आले आहेत. पैशांसाठी त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. बायकांची हौस पुरवण्याच्या नादात तो चक्क चोर झाला आहे. कुतुबुद्दीन असं या व्यक्तीचं नाव असून त्याला दोन पत्नी आहेत. 

दोन पत्नींचा खर्च उचलणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणं कुतुबुद्दीनला शक्य होत नव्हतं.  त्यांची हौस पूर्ण करता करता त्याचे हाल झाले होते. अखेर त्याने दोन्ही बायकांची मागणी पूर्ण करण्यासाठी चोर होण्याचा मोठा निर्णय घेतला. पण शेवटी त्याची पोलखोल झालीच आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमध्ये हिरानगर पोलीस गाड्यांची तपासणी करत होते. बापट चौकात त्यांना नंबरप्लेट नसलेली गाडी दिसली, त्यांनी ही गाडी थांबवली. 

कुतुबुद्दीनने मैदानातून गाडी केली चोरी 

गाडीचालकाकडे गाडीशी संबंधित कोणतीच कागदपत्रं नव्हतं. पण त्याच्याकडे एक चाकू सापडला. पोलीस त्याला हिरानगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्याची चौकशी केली असता ती गाडी चोरीची असल्याचं समजलं. कुतुबुद्दीनने आयटीआय मैदानातून ही गाडी चोरी केली होती. मैदानात तो फिरण्यासाठी गेला होता. हिरानगर पोलीस ठाण्यात या गाडीचोरीची तक्रारही होती. गाडीची नंबर प्लेट तोडून त्याने फेकून दिली होती आणि नंबर प्लेटशिवाय तो गाडी फिरवत होता.

कुतुबुद्दीन विरोधात चोरीच्या आठ तक्रारी 

पोलिसांनी कसून चौकशी केली असता. 55 वर्षीय कुतुबुद्दीन ही नंदानगरचा राहणारा आहे. आधी तो हिरानगर परिसरात राहायचा. दोन लग्न केल्यानंतर बायकांचा खर्च उचलण्यासाठी त्याने काही वर्षांपूर्वी चोरी करायला सुरुवात केली. संधी साधून तो गाडी चोरायचा आणि त्या विकायचा. त्याच्याविरोधात हीरानगर, कनाडिया, सेंटर कोतवाली, बदगौंदा, जुनं इंदौर, अन्नपूर्णा, खजराना या ठिकाणी चोरीच्या आठ तक्रारी आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News young man who had two wives could not fulfill his wish and became thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.