शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशामध्ये पोलीस कोठडीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 09:15 IST

Crime News : कासगंज येथील पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशामधील कासगंज येथील पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तरुणावर एका मुलीसोबत पळून गेल्याचा आरोप असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांत तरुणाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलाच्या मृत्यूला आत्महत्या म्हटलं आहे. मात्र कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचं म्हणत गंभीर आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.  

चांद मियां असं मृत तरुणाचं नाव असून तो सदर कोतवाली परिसरातील नागला सय्यद अहरोली येथील रहिवासी होता. त्याच परिसरातील एका तरुणीला घरातून पळवून नेण्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर केला होता. त्यामुळेच पोलिसांनी त्याला अधिकच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चांद मियांचे वडील अल्ताफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मी सोमवारी संध्याकाळी माझ्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. अवघ्या 24 तासांनंतर मला माहिती मिळाली की त्याने गळफास लावून घेतला आहे"

तरुणाने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "चौकशीदरम्यान चांद मियांने शौचालयात जायचे असल्याचे सांगितले. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने पोलीस कर्मचार्‍यांनी चौकशी केली असता तो शौचालयातील पाईपला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. चांद मियांने टोपी असलेलं एक जॅकेट घातलं होतं आणि त्याला दोरी होती. त्या दोरीने त्याने तिथे असलेल्या पाईपला गळफास लावून घेतला." घटनेनंतर एसपी रोहन प्रमोद बोत्रे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तरुणाला तातडीने रुग्णालयात नेले असता काही काळ उपचार केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे बोत्रे यांनी सांगितले. 

पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा 

प्राथमिक तपासात पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. चांद मियांने त्याच्या टोपीच्या वापर करून स्वतःला फासावर लटकवले होते या पोलिसांच्या सांगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासासाठी अद्याप समोर आलेले नाही. काँग्रेससह विरोधक या मुद्द्यावरून सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस