शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
3
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
4
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
5
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
6
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
7
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
8
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
9
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
10
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
11
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
12
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
14
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
15
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
17
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
18
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
19
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
20
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

Crime News: सवतीला पाहून महिलेचे माथे भडकले, पतीसमोरच तिला विवस्त्र केले आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 09:33 IST

Crime News: एका महिलेला विवस्त्र करून तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची गावातून धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रांची - एका महिलेला विवस्त्र करून तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची गावातून धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील रानिश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोन महिलांसह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक करण्यात आल्याचे रानिश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजीव प्रकाश यांनी सांगितले. (The woman was stripped naked and taken around the village in Jharkhand)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसानजोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेचा विवाह रानिश्वरमधील एका गावातील माणिक मिर्धा याच्याशी झाला होता. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी माणिक आणि कुलुगू गावातील एका विवाहित महिलेमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर महिनाभरापूर्वी ही महिला माणिकसोबत पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे निघून गेली.

दरम्यान, बुधवारी संध्याकाळी हे दोघेही कदमा गावात परत आले. त्यानंतर माणिकची पत्नी आणि घरातील अन्य व्यक्तींनी या महिलेला पकडले आणि तिला मारहाण केली. त्यानंतर तिला विवस्त्र करून तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची गावातून धिंड काढली. दरम्यान, ज्या १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सर्वजण माणिकचे कुटुंबीय असल्याचे पोलिसांनी सांगितले.

झारखंडमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. याचवर्षी मार्च महिन्यामध्ये झारखंडमधील एखा पंचायतीने जमावासमोर एका महिलेला मारहाण केली होती. या मारहाणीमुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडित महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारJharkhandझारखंड