शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! चेटकीण असल्याच्या संशयातून महिलेची हत्या; 6 वर्षीय लेकाने सांगितला घडलेला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:23 IST

Crime News : 6 वर्षीय लेकाने आपल्या आईसोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितल्याने ही घटना उघडकीस आली आहे.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. मात्र याच दरम्यान देशात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. चेटकीण असल्याच्या संशयातून एका महिलेची हत्या करण्याची आल्याची भयंकर घटना घडली आहे. 6 वर्षीय लेकाने आपल्या आईसोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितल्याने ही घटना उघडकीस आली आहे. झारखंडच्या पलामू-विश्रामपूरमध्ये एका महिलेची मान कापून हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार घडला आहे. महिलेच्या सहा वर्षीय मुलाने आपल्या आईसोबत काय झालं याची माहिती पोलिसांना दिली आहे. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, पाच जण अचानक घरात घुसले. त्यांनी आईला बेदम मारहाण करायला सुरुवात केली आणि तिला घराबाहेर काढलं. त्यानंतर तिची मान कापली. चिमुकल्याने आरोपींमध्ये आपल्या सख्ख्या काकाचं देखील नाव घेतलं आहे. एक महिन्यापूर्वी शेजारी राहणाऱ्या एका मुलीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून महिलेवर संशय घेतला जात होता. महिलेला काही लोकांनी धमकी देखील दिली होती. 

सूरजमनी देवी असं या 40 वर्षीय महिलेचं नाव आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. महिला नेहमीप्रमाणे आपला मुलगा आलोकसोबत घरात झोपली होती. त्याचवेळी आलोकने त्याचे काका, शेजारी राहणारी व्यक्ती, निवृत्त मुख्याध्यापकसह पाच जण आपल्या घरी आले आणि आपल्या आईला अंथरूणातून उचलून बाहेर घेऊन गेले. तिला बेदम मारहाण करत तिची हत्या केली अशी माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही महिला चेटकीण असल्याचा संशय असल्याने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, पैसे संपल्याने पत्नी आणि मेव्हण्याने बेदम मारलं; पतीचं डोकंच फुटलं

लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हातावरचं पोट असणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशातच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली आणि कमाईच साधन नसल्याने जमा केलेले पैसे संपले त्यामुळे एका व्यक्तीला पत्नी आणि मेव्हण्याने बेदम मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीत पतीचं डोकं फुटलं असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. बिहारच्या छपरा शहरामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये पतीच्या कमाईचं साधन बंद झाल्याने पत्नी नाराज झाली होती. रागाच्या भरात पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने पतीला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये पती गंभीररित्या जखमी झाला असून त्याला त्याच्या भाच्याने उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडPoliceपोलिस