Crime News: २० दिवसांच्या आत सासू-सुनेची एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने हत्या, धक्कादायक प्रकारामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 16:35 IST2022-05-03T16:34:41+5:302022-05-03T16:35:49+5:30
Crime News: बिहारमधील पूर्णिया येथे २० दिवसांच्या कालावधीमध्ये सासू आणि सुनेच्या झालेल्या हत्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. जिल्ह्यातील बडहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भटोतर गावामध्ये २० दिवसांपूर्वी सासूची हत्या झाली होती.

Crime News: २० दिवसांच्या आत सासू-सुनेची एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने हत्या, धक्कादायक प्रकारामुळे खळबळ
पाटणा - बिहारमधील पूर्णिया येथे २० दिवसांच्या कालावधीमध्ये सासू आणि सुनेच्या झालेल्या हत्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. जिल्ह्यातील बडहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भटोतर गावामध्ये २० दिवसांपूर्वी सासूची हत्या झाली होती. त्या घटनेनंतर सोमवारी संध्याकाळी सुनेचीही धारदार हत्यारानं कापून हत्या करण्यात आली.
या घटनेनंतर मृत महिला हबिया देवी हिच्या मुलग्याने सांगितले की, त्याची आई रात्री बरहरा येथील आपल्या दुकानातून येत होती. तेव्हा ही घटना घडली. भटोतरमध्ये ठाण्यापासून केवळ २०० मीटर अंतरावर रेल्वे गुमटीजवळ कुणीतरी आईच्या डोक्यावर मागून धारदार हत्याराने वार केला. त्यामुळे त्यामुळे तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. २० दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी माझ्या आजीचीही मंदिरासमोर धारदार हत्याराने हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या हत्यांमागे शेजारी लक्ष्मण शर्मा याच्यावर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी डॉगस्कॉडच्या मदतीने छापेमारी करून मृत महिलेच्या पुतण्याला अटक केली आहे. त्याने त्याच्या आजीचीही अशाच प्रकारे धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. तसेच सोमवारी संध्याकाळी त्याने आपल्या काकीचीही हत्याराने वार करून हत्या केली.
बडहरा पोलीस ठाण्याटे गृहरक्षक पन्नालाल यादव यांनी सांगितले की, सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांनी मृत महिलेच्या पुतण्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडे चौकशी सुरू आहेत.