शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: आई-वडिलांसमोरच केली पत्नीची हत्या, मग मृतदेह जंगलात फेकला, ब्लाईंड मर्डर मिस्ट्रीचा पोलिसांनी असा छडा लावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 23:15 IST

Crime News: उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एका हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. येथे हुंड्यासाठी एका नवविवाहित तरुणीची हत्या करण्यात आली. तिच्या हत्येनंतर अपहरण झाल्याचे नाटक रंगवण्यात आले. मात्र जेव्हा पोलिसांनी या ब्लाईंड मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केला तेव्हा मृत महिलेचा पती आणि सासू-सासरे गजाआड गेले.

गाझियाबाद - उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एका हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. येथे हुंड्यासाठी एका नवविवाहित तरुणीची हत्या करण्यात आली. तिच्या हत्येनंतर अपहरण झाल्याचे नाटक रंगवण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनाही ते खरे वाटले. मात्र जेव्हा पोलिसांनी या ब्लाईंड मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केला तेव्हा मृत महिलेचा पती आणि सासू-सासरे गजाआड गेले.

ही धक्कादायक घटना गाझियाबादमधील विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे अत्यंत भयानक पद्धतीने हे हत्याकांड घडवले गेले. एका नवविवाहितेची पतीने हत्या केली. मत तिच्या मृतदेहाचे आई-वडिलांसमोरच तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे नदी आणि जंगलामध्ये फेकले. त्यानंतर या नराधम पतीने पोलीस आणि सासरच्या मंडळींपासून वाचण्यासाठी पत्नीचे अपहरण झाल्याचा बनाव रचला.

२४ वर्षीय रिया जैन हिचा विवाह १० महिन्यांपूर्वी गाझियाबादमधील सिद्धार्थ विहार येथील आकाश त्यागी याच्याशी झाला होता. तो पेशाने इंजिनियर होता. आकाश आणि रिया एकमेकांवर प्रेम करायचे. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचे लग्न लावून दिले होते. मात्र लग्नानंतर आकाशच्या कुटुंबीयांनी खरे रंग दाखवले. ते हुंड्यासाठी रियाला त्रास देऊ लागले.

अखेर लग्नाच्या दहा महिन्यांनंतरच हुंड्यापायी पती आणि सासरच्या मंडळींनी रियाची गळा कापून हत्या केली. तसेच तिचा मृतदेह दोन तुकडे करून नदी आणि जंगलामध्ये फेकून दिला. हत्येच्या या घटनेनंतर आकाश आणि त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा कट रचला.

त्यानुसार रियाचा पती असलेल्या आकाशने पोलिसांना ११२ नंबरवर फोन करून त्याच्या पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तपासाला सुरुवात केली. यादरम्यान पोलीस तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली. पलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती आणि सासू-सासऱ्यांनीच रियाचे डोके धडापासून वेगळे करून तिची हत्या केली. मात्र पोलिसांना तिचे अपहरण झाल्याची माहिती दिली. रियाच्या भावाने कुणाकडून तरी कर्ज घेतले होते. काही जण घरी आले आणि त्यांनी तिचे अपहरण करून घेऊन गेले, असा दावा त्यांनी केला होता. मात्र आपण केलेला गुन्हा कधीच उघडकीस येणार नाही. तसेच तिचा मृतदेहही कुणाला सापडणार नाही, अशी आरोपींना खात्री होती.

याबाबत सीओ स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितले की, अपहरणाच्या तक्रारीनुसारा आम्ही तपासास सुरुवात केली तेव्हा आम्हाला अनेक कच्चे दुवे दिसून आले. त्यानंतर सर्व्हिलान्स आणि मेन्युअल इंटेलिजन्सच्या आधारावर आम्ही याचा शोध घेतला. अखेरीस रियाचा पती आकाश त्यागी, त्याचे वडील सुरेश त्यागी आणि आई उषा त्यागी यांना अटक केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार