माता न तू वैरिणी! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच केली अवघ्या एका दिवसाच्या लेकीची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 07:14 PM2021-10-21T19:14:33+5:302021-10-21T19:16:16+5:30

Crime News : मुलाच्या हव्यासापोटी दोन मुलींची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

Crime News want of son mother killed 1 day old girl by pressing with pillow 2 were murdered in 24 hours | माता न तू वैरिणी! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच केली अवघ्या एका दिवसाच्या लेकीची हत्या 

माता न तू वैरिणी! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच केली अवघ्या एका दिवसाच्या लेकीची हत्या 

Next

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालमध्ये (West Bengal) नात्याला काळीमा फासणाऱ्या दोन घटना समोर आल्या आहेत. मुलाच्या हव्यासापोटी दोन मुलींची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. पहिली घटना बांकुरा जिल्ह्यातील आहे, जिथे वडिलांनी मुलाच्या हव्यासापोटी आपल्या नवजात मुलीची हत्या केली. तर दुसरी घटना कोलकाता महानगरातील इक्बालपूर (Kolkata) येथील आहे, जिथे जन्मदात्या आईनेच नर्सिंग होममध्ये अवघ्या एका दिवसाच्या नवजात लेकीचं तोंड उशीने दाबून तिची हत्या केली आहे. गेल्या 24 तासांत दोन नवजात बाळांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी इक्बालपूर पोलीस ठाणे परिसरात एका आईने उशीने तोंड दाबून तिच्या एक दिवसाच्या बाळाची हत्या केली. सकाळी 6.20 वाजता मुलीचा जन्म झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, लवली सिंहला (21) इक्बालपूर लेन येथील नेताजी सुभाष नर्सिंग होम आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. जिथे लवलीने मंगळवारी सकाळी एका मुलीला जन्म दिला. नर्सने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी झाल्याचं समजताच लवली नाराज झाली. तिचा पती अजय सिंह तिच्यासोबत होता. बुधवारी सकाळी जेव्हा ती 5.30-6.00 च्या दरम्यान ड्युटीवर असलेल्या आया मुलीला बघायला गेल्या तेव्हा मुलगी मृतावस्थेत आढळली. 

मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच केली लेकीची हत्या 

रुग्णालयाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता तिच्या नाकावर दाबण्याच्या खुणा आहेत. मुलीच्या आईची बराच वेळ चौकशी करण्यात आली. ज्यानंतर तिने आपणच मुलीच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिला मारुन टाकल्याचं कबूल आहे. तर दुसरीकडे, बांकुराच्या छटना पोलीस स्टेशन परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांना मुलगा हवा होता, पण दुसरीही मुलगी झाली. त्यामुळे वडिलांनी आपल्या 16 दिवसांच्या मुलीची हत्या केली आणि तिला शेतात नेऊन पुरलं. बुधवारी कोजागरीच्या दिवशी एका सोळा दिवसांच्या मुलीचा मृतदेह शेतात सापडला.

दुसरीही मुलगीच झाली म्हणून पिता झाला हैवान

पोलीस आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीनाथ सोरेन सलग दोन मुलींच्या जन्मामुळे आनंदी नव्हता. दरम्यान, अचानक एक मुलगी गायब झाली. मुलगी सापडली नसल्यानं आईला संशय आला. आईनं पोलिसांकडे तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारावर छटना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर शेतात मुलीचा मृतदेह सापडला. तपासात तिच्या वडिलांनी तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह शेतात पुरल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी अश्विनीनाथ सोरेन याला अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News want of son mother killed 1 day old girl by pressing with pillow 2 were murdered in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app