शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! बलात्कारानंतर महिलेची निर्घृण हत्या; तब्बल 15 वेळा चाकूने केले वार नंतर फोडले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 11:21 IST

Crime News : महिलेच्या गळ्यावर, पोटावर, चेहऱ्यावर तब्बल 15 हून अधिक वेळा चाकूने हल्ला केल्यानंतर तिचे डोळे फोडण्यात आले आहेत

नवी दिल्ली - बिहारच्या छपरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. क्रूरतेचा कळस पाहायला मिळाला आहे. एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. निर्वस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या गळ्यावर, पोटावर, चेहऱ्यावर तब्बल 15 हून अधिक वेळा चाकूने हल्ला केल्यानंतर तिचे डोळे फोडण्यात आले आहेत. यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छपरा जिल्ह्यातील बनियापूर पोलीस ठाण्याच्या भागात ही भयंकर घटना आहे. एक 32 वर्षीय महिला आपल्या पतीसोबत याच गावात राहते. नेहमीप्रमाणे ती महिला बकऱ्यांसाठी चारा आणावा म्हणून जंगलात गेली होती. मात्र रात्र झाली तरी महिला घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. खूप वेळ शोध घेतल्यानंतर गावाच्या बाहेर असलेल्या झुडपात महिलेचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर मृतदेहाची स्थिती पाहून त्यांना देखील मोठा धक्काच बसला. 

महिलेवर 15 हून अधिक वेळा चाकूने अनेक वार करण्यात आले आणि नंतर तिचे डोळेही फोडण्यात आले होते. मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा स्थानिकांनी तीव्र विरोध केला. लोकांनी सांगितले की जोपर्यंत मारेकरी पकडले जात नाहीत, तोपर्यंत मृतदेह तेथून उचलू दिला जाणार नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचल्यावर त्यांनी गावकऱ्यांना समजावलं आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

संतापजनक! आजोबांनी केलं लैंगिक शोषण; मदतीसाठी 'ती' भाऊ अन् काकाकडे गेली तर त्यांनीही केले अत्याचार

देशात बलात्काराच्या, महिलांवरील अत्याचाराच्या अनेक भयंकर घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील आजोबा, काका आणि भावाने चिमुकलीचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रात्री झोपेत असताना आजोबांनी मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर मदतीसाठी काका आणि भावाकडे गेली असता त्या दोघांनी देखील अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. तामिळनाडूमध्ये ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका 62 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीनो सात वर्षांच्या नातीचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIndiaभारत