संतापजनक! जन्मदाता बापच झाला हैवान; चिमुकल्याला केली अमानुष मारहाण, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 17:27 IST2021-11-30T17:19:08+5:302021-11-30T17:27:04+5:30
Crime News : मुलाने नातेवाईकांच्या घरी मस्ती केल्याचा राग अनावर झाल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

संतापजनक! जन्मदाता बापच झाला हैवान; चिमुकल्याला केली अमानुष मारहाण, Video व्हायरल
नवी दिल्ली - लहान मुलं ही मस्ती करतात. त्यावेळी अनेकदा पालक त्यांना ओरडतात तर कधी कधी मारतात. पण काही वेळा मुलांना मारण्याऐवजी समजून सांगितल्यास ती ऐकतात. काही पालक मुलांना शिस्त लागावी म्हणून कठोर शिक्षा देतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. हैदराबादमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. जन्मदाता बापच हैवान झाला असून त्याने आपल्या चिमुकल्याला अमानुष मारहाण केली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये वडील मुलाला मारहाण करताना दिसत आहेत.
मुलाने नातेवाईकांच्या घरी मस्ती केल्याचा राग अनावर झाल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी मुलाच्या आईने पोलिसांत धाव घेत आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता पतीला अटक करण्यात आली आहे. अशोक घंटे असं आरोपीचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला असून आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
इस वीडियो का लोकेशन अगर पता हो कृपया शेयर करें. इस ज़ालिम को कड़ी सज़ा मिलनी चाहिए. pic.twitter.com/6qZYn3OOz0
— Awanish Sharan (@AwanishSharan) November 29, 2021
रागावलेल्या वडिलांनी केली मुलाला बेदम मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबादमध्ये राहणाऱ्या या कुटुंबातील मुलाचा त्याच्या मावशीकडे सोडण्यात आलं होतं. पण मुलगा मावशीकडे खूप मस्ती करायचा. त्यामुळे मावशीने मुलाच्या वडिलांना फोन केला आणि मुलगा त्रास देत असल्यामुळे त्याला घेऊन जाण्याची विनंती केली. या प्रकारामुळे संतापलेल्या बापाने मुलाला ओढत ओढत घरी आणलं. घरात असलेला एक ऊस घेऊन त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तसेच मुलाला मारहाण करण्यापूर्वी मुलीच्या हातात मोबाईल देत या घटनेचं रेकॉर्डिंगही करायला सांगितलं.
आईने उचललं टोकाचं पाऊल, केलं असं काही...
रागाच्या भरात अशोकने मुलाला अमानूषपणे मारहाण करायला सुरुवात केली. मुलगा ओरडत होता आणि आपल्याला मारहाण न करण्याची विनंती करत होता. शूटिंग करणारी त्याची बहीणदेखील भावाला सोडून देण्याची विनंती तिच्या वडिलांना करत होती. मात्र त्याने मारहाण सुरूच ठेवली. मुलाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या अनेक जखमा आहेत. याच दरम्यान पत्नीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अशोकला अटक केली असून ते याप्रकरणाची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.