शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! मोठ्या भावावर तरुणीचं प्रेम असल्याने लहान भाऊ संतापला; 'तिला' जिवंत जाळून बदला घेतला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 14:49 IST

Crime News : भाजल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बुलंदशहरमध्ये (Bulandshahr) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीला जिवंत जाळण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. भाजल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शेजारी राहणाऱ्या आरोपीने तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. तिच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता तिचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या भावावर तरुणीचं प्रेम असल्याने लहान भाऊ संतापला आणि त्याने रागाच्या भरात तिला जिवंत जाळलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम होतं. मात्र तरुणाच्या लहान भावाला या दोघांचं प्रेम मान्य नव्हतं. तो यामुळे नाराज होता. म्हणूनच तो वारंवार या दोघांना त्रास देत तसेच त्यांच्या प्रेमात अडथळा आणत होता. त्या दोघांनाही जोरदार विरोध करत होता. अशातच आरोपीने तरुणीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तरुणीला त्याने काही कारणाने घरात बोलावलं आणि तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळलं. यानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. 

आरोपीने तरुणीला जिवंत जाळल्यानंतर ती मोठमोठ्याने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून लोक तिच्या मदतीसाठी धावत आले. पण तोपर्यंत आरोपीन तेथून पळ काढला होता. गावकऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तरुणीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तरुणाची मृत्यू झाला आहे. पोलीस तपास करत असून लवकरात लवकर आरोपीचा शोध घेण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

संतापजनक! सासरच्यांकडून बुलेट न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला 6 दिवस डांबून ठेवलं, बेदम मारलं

 उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सासरच्यांकडून बुलेट (Bullet Bike) न मिळाल्याने नाराज झालेल्या पतीने आपल्या पत्नीला तब्बल 6 दिवस डांबून ठेऊन तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला कशीबशी पतीच्या तावडीतून आपली सुटका केली आणि पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांना आपल्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या पतीने माहेरच्यांकडून बुलेट आणण्यास सांगितलं होतं. मात्र त्याला बुलेट न मिळाल्याने पती नाराज झाल्याची माहिती महिलेने दिली आहे. संतापलेल्या पतीने मला आठवड्याभर बांधून ठेवलं होतं. त्यानंतर त्याने बेल्टने मला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस