Crime News: रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत रेल्वे प्रवाशांना लुबाडणारे त्रिकुट गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 14:59 IST2022-11-21T14:58:47+5:302022-11-21T14:59:16+5:30
Crime News: रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या त्रिकुटाला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहित तेजी उर्फ रीतिक, लखन गायकवाड, दीपक वासकर उर्फ पांड्या अशी या तीन चोरट्यांची नावे आहेत.

Crime News: रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत रेल्वे प्रवाशांना लुबाडणारे त्रिकुट गजाआड
- मुरलीधऱ भवार
कल्याण- रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या त्रिकुटाला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहित तेजी उर्फ रीतिक, लखन गायकवाड, दीपक वासकर उर्फ पांड्या अशी या तीन चोरट्यांची नावे आहेत. हे तिघेही सराईत गुन्हेगार आहेत.
रोहित विरोधात उल्हासनगर ,अंबरनाथ पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी,हत्येचा प्रयत्न, हाणामारी सारखे तब्बल डझनभर गुन्हे दाखल आहेत..त्याच्या विरोधात तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. तर दीपक उर्फ पांड्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल आहे.
काही दिवसांपूर्वी उल्हासनगर रेल्वे स्थानक जवळ असलेल्या रेल्वे रुळावर लघुशंका करणाऱ्या एका प्रवाशाला तीन जणांनी गाठले. त्याला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटली. पाेलिसांनी रोहित मुकेश तेजी उर्फ रितिक, लखन गायकवाड ,दीपक वासकर उर्फ पांड्या या तिघांना अटक केली. रोहित कडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. रोहित तेजी उर्फ रितिक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात तसेच अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न ,चोरी, घरफोडी, हाणामारी ,असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर लखन गायकवाड याच्या विरोधात उल्हासनगर मधील पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल आहे.