शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Crime News: सेक्स रॅकेट प्रकरणी टॉप मॉडेल आणि अभिनेत्रीला मुंबईत अटक, दोन तासांसाठी आकारायच्या दोन लाख रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 08:46 IST

Sex racket destroyed by Mumbai police: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने जुहूमधील एका हॉटेलमधून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. क्राइम ब्रँचने जुहूमधील एका पंचतारांकित हॉटेलमधून मुंबईतील एक आघाडीची मॉडेल आणि एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला अटक केली आहे.

मुंबई - अश्लिल चित्रपटांच्या निर्मितीमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर आता मुंबईपोलिसांच्या क्राईम ब्रँचने जुहूमधील एका हॉटेलमधून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. (Sex racket destroyed by Mumbai police) क्राइम ब्रँचने जुहूमधील एका पंचतारांकित हॉटेलमधून मुंबईतील एक आघाडीची मॉडेल आणि एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला अटक केली आहे. मात्र या प्रकरणात त्यांना अटक न दाखवता त्यांची सुटका करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर या प्रकरणात ईशा खान नामक एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ती हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. (Top model and actress arrested in Mumbai in sex racket case, Charged Rs 2 lakh for two hours)

ईशा खान ही महिला बऱ्याच दिवसांपासून मुंबईतील मोठ्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवत होती, अशी माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एक पथक तयार केले. सुरुवातीला क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने बनावट ग्राहक बनून ईशा खानशी संपर्क साधला. त्यानंतर ईशा खानने अनेक फोटो पाठवले. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याने त्यातील दोन फोटो निवडले. यामधील एक तरुणी अनेक जाहिरातींमध्ये काम करते. तर दुसऱ्या तरुणीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

ईशा खानने प्रत्येक मुलीसाठी प्रत्येक दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेणार असल्याचे सांगितले. या दोन लाखांपैकी ५० हजार रुपये हे ईशा खान हिला मिळणार होते. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी त्या तिघांनाही जुहूमधील एका हॉटेसमध्ये भेटण्यासाठी बोलावले. गुरुवारी रात्री ईशा खान, संबंधित मॉडेल आणि अभिनेत्री हॉटेलच्या बाहेर पोहोचताच क्राईम ब्रँचच्या टीमने त्यांना अटक केली.

दरम्यान, या मॉडेल आणि अभिनेत्रीने सांगितले की, कोरोनामुळे जेव्हापासून लॉकडाऊन लागले आहे तेव्हापासून काम मिळत नाही आहे. लॉकडाऊनमुळे ती ज्या मालिकेमध्ये काम करायची ती बंद आहे. त्यामुळे मुंबईत राहण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळेच मी या धंद्यामध्ये आले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटMumbaiमुंबईTV Celebritiesटिव्ही कलाकारPoliceपोलिस