Crime News: एकाच कुटुंबातील तिघांनी केले विष प्राशन, तिघांचीही प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 10:20 IST2022-04-19T10:20:14+5:302022-04-19T10:20:51+5:30

Crime News: सिरसो येथील पारधी नगरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली.

Crime News: Three members of the same family poisoned, all three are in critical condition | Crime News: एकाच कुटुंबातील तिघांनी केले विष प्राशन, तिघांचीही प्रकृती गंभीर

Crime News: एकाच कुटुंबातील तिघांनी केले विष प्राशन, तिघांचीही प्रकृती गंभीर

मूर्तिजापूर - सिरसो येथील पारधी नगरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली.

सिरसो गायरान पारधी नगरात राहणाऱ्या शितल गणेश चव्हाण (१८), मनिषा हिरालाल चव्हाण (२०) हिरालाल गोपाल चव्हाण (२५) या एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, शितल चव्हाण व मनिषा चव्हाण यांनी घरीच विष घेतले त्यांना तातडीने येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच हिरालाल याने रुग्णालयाच्या आवारात रात्री १०:३० वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात विष प्राशन केले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती येथील रुग्णालय सुत्रांनी दिली. वृत्त लिहिस्तोवर घटने मागील कारण कळू शकले नाही.

Web Title: Crime News: Three members of the same family poisoned, all three are in critical condition