शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ‘त्या’ अफ्रिकन तस्कराकडून ठाणे पोलिसांनी जप्त केले आणखी २२ लाखांचे कोकेन

By जितेंद्र कालेकर | Updated: August 10, 2022 21:55 IST

Crime News: अफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस उर्फ किंग ( सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई ) याच्या ताब्यातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने आणखी २२ लाख ८० हजारांचे ५६ ग्रॅम कोकेन हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी बुधवारी दिली.

- जितेंद्र कालेकरठाणे - अफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस उर्फ किंग ( सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई ) याच्या ताब्यातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने आणखी २२ लाख ८० हजारांचे ५६ ग्रॅम कोकेन हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी बुधवारी दिली. आतापर्यंत त्याच्याकडून ४६ लाख ८० हजारांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर भागातील हिंदुस्थान रेसिडेंसी हॉटेल, येथे कोकेन या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या कोफी याला अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अविनाश महाजन, जमादार शशीकांत सालदुर, सुनिल अहिरे आणि पोलीस हवालदार सुनिल रावते आदींच्या पथकाने ३ आॅगस्ट रोजी सापळा रचून अटक केली.

त्याच्या ताब्यातून सुरुवातीला २४ लाखांचे ६० ग्रॅम इतके कोकेन, एक मोबाईल, रिपब्लीक आॅफ आयवोरी कोस्ट या देशाचा पासपोर्ट आणि विजा आदी जप्त केले होते. दरम्यान, सखोल चौकशीतून त्याच्या मुंबईतील घरातून या पथकाने आणखी ५६ ग्रॅम कोकेन जप्त केले. त्याला सुरुवातीला ९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. आता त्याच्या कोठडीत आणखी वाढ केली असून त्याला १२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मंगळवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थthaneठाणे