"सॉरी पप्पा, तुमची स्वप्न पूर्ण करू शकत नाही कारण..."; विद्यार्थ्याची हादरवून टाकणारी सुसाईड नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 22:49 IST2022-03-13T22:37:02+5:302022-03-13T22:49:47+5:30

Crime News : एका नववीच्या विद्यार्थ्याने मुलांच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये वडिलांची माफी मागितली आहे.

Crime News student commits suicide in burhanpur in suicide note i read but i forget father forgive me | "सॉरी पप्पा, तुमची स्वप्न पूर्ण करू शकत नाही कारण..."; विद्यार्थ्याची हादरवून टाकणारी सुसाईड नोट

"सॉरी पप्पा, तुमची स्वप्न पूर्ण करू शकत नाही कारण..."; विद्यार्थ्याची हादरवून टाकणारी सुसाईड नोट

नवी दिल्ली - देशामध्ये अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका नववीच्या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. बुरहानपुर जिल्ह्यातील नेपानगरमध्ये एका नववीच्या विद्यार्थ्याने मुलांच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये वडिलांची माफी मागितली आहे. वडिलांना एक पत्र लिहिलं. ज्याची सुरुवात लव्ह यू पापा पासून केली आहे. मी जे काही वाचतो, अभ्यास करतो ते सर्व विसरून जातो. त्यामुळे मी वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या इच्छेने आत्महत्या करीत आहे असं म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच नेपानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. येथे नववीतील मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. त्याच्या खोलीचा तपास केल्यानंतर एक सुसाईड नोट सापडली. अल्पवयीन मुलाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, त्याला विसरण्याचा आजार होता. ज्यामुळे तो अभ्यास करीत असला तरी विसरून जात होता. यामुळे तो आपल्या आई-वडिलांचं स्पप्न पूर्ण करू शकत नव्हता आणि म्हणूनच त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

माझ्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं विद्यार्थ्याने म्हटलं आहे. तसेच मुलाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून महत्त्वाची बाब समोर आली आहे. त्याचं वडिलांवर खूप प्रेम होतं. तुमच्यासारखे बाबा मला लाभले हे माझं भाग्य असल्याचंही त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. तुमचा मुलगा हा तुमची स्वप्न पूर्ण करणारा असायला हवा होता. मात्र मी काही करू शकत नाही. मला माफ करा... असं ही त्याने म्हटलं आहे. मुलाच्या आत्महत्येने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News student commits suicide in burhanpur in suicide note i read but i forget father forgive me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.