Crime News: दक्षिण गोव्याच्या पोलीस उपनिरीक्षकांवर कोल्हापूरात बलात्कराचा गुन्हा, लग्नाचे अमिष दाखवून कृत्य

By तानाजी पोवार | Published: August 7, 2022 09:33 PM2022-08-07T21:33:08+5:302022-08-07T21:34:56+5:30

Crime News: दक्षिण गोवा येथील मडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या पोलीस उपनिरीक्षकावर कोल्हापूरात शाहुपूरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

Crime News: South Goa police sub-inspector accused of rape in Kolhapur, act of luring marriage | Crime News: दक्षिण गोव्याच्या पोलीस उपनिरीक्षकांवर कोल्हापूरात बलात्कराचा गुन्हा, लग्नाचे अमिष दाखवून कृत्य

Crime News: दक्षिण गोव्याच्या पोलीस उपनिरीक्षकांवर कोल्हापूरात बलात्कराचा गुन्हा, लग्नाचे अमिष दाखवून कृत्य

Next

- तानाजी पोवार

कोल्हापूर - दक्षिण गोवा येथील मडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या पोलीस उपनिरीक्षकावर कोल्हापूरात शाहुपूरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. लग्नाचे अमिष दाखवून कोल्हापूरात आणून बलात्कार केल्याची तक्रार एका विवाहीत पिडीतेने दिली. विराग पवार (रा. सालसेट, दक्षिण गोवा, राज्य गोवा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आपला मित्र घरी आला नसल्याने तक्रार देण्यासाठी गोव्यातील पिडीत महिला दक्षिण गोव्यातील मार्गोवा पोलीस ठाण्यात  गेली होती. तेथे मित्राला शोधण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विराग पवार याने पिडीतेस मदत केली. त्यावेळी त्याने पिडीतेस अपाला मोबाईल नंबर दिला होता. त्यातून त्यांची ओळख वाढली. संशयित आरोपी पवार याने तिला तुझ्या मुलीचाही सांभाळ करतो असे सांगून लग्नाचे अमिष दाखवले.

त्यानंतर पिडीतेस महाबळेश्वरला फिरायला जाऊ असे सांगून दि. १९ ते २१ जुलै रोजी कोल्हापूरात शाहुपूरी येथील एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याबाबत दक्षिण गोवा येथील मार्गोवा पोलीस ठाणे येथे पिडीतेने तक्रार दिली. त्यानुसार शुन्य नंबरने गुन्हा दाखल होता. त्याची कागदपत्रे कोल्हापूरात प्राप्त झाल्याने शाहुपूरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विराग पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला.

Web Title: Crime News: South Goa police sub-inspector accused of rape in Kolhapur, act of luring marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.