Crime News: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:33 IST2022-08-10T17:32:36+5:302022-08-10T17:33:08+5:30
Crime News: अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट शहरात उघडकीस आली. याप्रकरणी ९ रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Crime News: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
- चैतन्य जोशी
हिंगणघाट - अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट शहरात उघडकीस आली. याप्रकरणी ९ रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. १५ वर्षीय पीडितेशी आरोपी रजत लक्ष्मीकांत कांबळे (१९) याची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले याची संधी साधून आरोपी रजत याने पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण केले. तसेच तु जर ही बाब कुणाला सांगितली तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. अखेर पीडितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. घरच्यांनी थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रारीवरुन आरोपी रजत कांबळे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.