Crime News Satara: सातारा: करंजे येथे दोन गटात हाणामारी; काहीजणांच्या हातात धारदार शस्त्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 23:47 IST2022-02-11T23:41:57+5:302022-02-11T23:47:37+5:30
Crime News Satara: शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास करंजे गावच्या कमानीलगत मारहाणीची घटना घडली.

Crime News Satara: सातारा: करंजे येथे दोन गटात हाणामारी; काहीजणांच्या हातात धारदार शस्त्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
करंजे : सातारा शहरालगतच्या करंजे येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास करंजे गावच्या कमानीलगत मारहाणीची घटना घडली. दोन गटातील युवक समोर समोर आले होते. जवळपास २० ते २५ सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. तसेच काहीजणांच्या हातात धारदार शस्त्र होते. मारहाणीचा हा प्रकार बराच वेळ सुरू होता. मारहाण करणारे युवक स्थानिक नसल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती.