खळबळजनक! औषध आणायला घराबाहेर पडली अन् जीव गमावून बसली; प्रियकरासह आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 16:34 IST2022-04-24T16:32:09+5:302022-04-24T16:34:17+5:30
Crime News : औषध आणायला एक तरुणी घराबाहेर पडली पण नंतर ती परतलीच नाही. प्रियकरासह तिचा मृतदेह आढळला

खळबळजनक! औषध आणायला घराबाहेर पडली अन् जीव गमावून बसली; प्रियकरासह आढळला मृतदेह
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका कपलची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरदोई जिल्ह्यातील बिलगाव येथे ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हत्या की आत्महत्या असा प्रश्न अनेकांना पडला आहे. औषध आणायला एक तरुणी घराबाहेर पडली पण नंतर ती परतलीच नाही. प्रियकरासह तिचा मृतदेह आढळला
मिळालेल्या माहितीनुसार, बिलगावातील मोहल्ला रफायत गंज येथील रहिवासी झाकीर यांची 26 वर्षीय मुलगी तबस्सुम उर्फ मुन्नी ही शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तापाचे औषध घेण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने तिचा शोध सुरू झाला. याच दरम्यान, दुपारी शहरातील जुन्या सीएचसीमध्ये दोन मृतदेह सापडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी, एएसपी पूर्वी अनिल कुमार यादव, जिल्हाधिकारी आणि सीईओ यांच्यासोबत फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली. तपासादरम्यान, मृतदेहाची ओळख पटली आहे. हे मृतदेह तबस्सुम उर्फ मुन्नी आणि रमेश राठोड या 27 वर्षीय तरुणाचा आहे. तर घटनास्थळी एक पिस्तूलही सापडले आहे. असे सांगण्यात येत आहे की, या दोघांची हत्या करण्यात आली आहे. मात्र, ही आत्महत्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच याबाबत खुलासा होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
बिलगावातील मोहल्ला रफायत गंज येथील रहिवासी असलेल्या झाकीर यांना दोन मुली आणि तीन मुले आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे. त्यांची मुलगी तबस्सुम उर्फ मुन्नी हिचा विवाह मल्लवन गावात निश्चित झाला होता. 16 मे वरात येणार होती. विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, त्यापूर्वीचा तिचा प्रियकरासोबत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.