संतापजनक! जवानाच्या पत्नीवर दिराकडून तब्बल 18 वर्षे बलात्कार; घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 16:49 IST2022-01-14T16:46:00+5:302022-01-14T16:49:23+5:30
Crime News : मुख्य आरोपी आपल्या लहान भावाच्या पत्नीवर गेल्या 18 वर्षांपासून बलात्कार करत होता.

संतापजनक! जवानाच्या पत्नीवर दिराकडून तब्बल 18 वर्षे बलात्कार; घटनेने खळबळ
नवी दिल्ली - देशामध्ये अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका जवानाच्या पत्नीवर दिराकडून तब्बल 18 वर्षे बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमध्ये हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे महिलेच्या पतीला देखील याची माहिती होती. तिने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती पतीला दिली असता त्याने आपल्या मोठ्या भावाचीच बाजू घेतली. तब्बल होती 18 वर्षांनंतर आता हा भयंकर प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आपल्या लहान भावाच्या पत्नीवर गेल्या 18 वर्षांपासून बलात्कार करत होता. महिलेचा पती सैन्यात कार्यरत आहे. जेव्हा महिलेने पतीला त्याच्या मोठ्या भावाच्या म्हणजेच दिराच्या भयंकर कृत्याबद्दल सांगितलं तेव्हा पतीने पत्नीची साथ देण्याऐवजी आपल्या मोठ्या भावाचीच बाजू घेतली. घरात राहायचे असेल तर तुला हे सर्व सहन करावेच लागेल, असं पतीने पत्नीला सांगितल्याचं समोर आलं आहे.
पीडित महिलेने हिंमत दाखवत पती आणि दिराविरुद्ध थाटीपूर पोलीस ठाण्यात बलात्कार व गैरकृत्याला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2003 मध्ये आरोपी दिराने पहिल्यांदा अत्याचार केल्याची घटना घडली होती. तिचे तेव्हा नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी ती अवघ्या 19 वर्षांची होती. घरच्या प्रतिष्ठेसाठी ती शांत राहिली होती. तिने घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला. त्यावर तिला पतीने साथ दिली नाही. महिलेने अनेक वेळा विरोध करायचा प्रयत्न केला त्यावर दिराने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
दिराने रोज तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा कसून तपास करून आरोपीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल करून बलात्कार करणाऱ्या दिराला अटक केली आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, ही महिला भिंड येथील रहिवासी आहे. तिचा पती लष्करात आहे. महिलेचा दीर गेल्या अनेक वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.