Crime News: रहिवासी इमारतीत वेश्याव्यवसाय, ८ ग्राहक आणि ६ दलाल ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 07:49 IST2022-06-20T07:48:50+5:302022-06-20T07:49:58+5:30
Crime News: एका दोन मजली इमारतीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने कारवाई करत ३३ महिलांसह ८ ग्राहक आणि ६ दलालांना ताब्यात घेतले.

Crime News: रहिवासी इमारतीत वेश्याव्यवसाय, ८ ग्राहक आणि ६ दलाल ताब्यात
मुंबई : एका दोन मजली इमारतीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने कारवाई करत ३३ महिलांसह ८ ग्राहक आणि ६ दलालांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ नेही कारवाई केली आहे. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
व्ही. पी. रोड येथील नवलकर लेनवरील दुमजली इमारतीच्या तळ आणि दुसऱ्या मजल्यावर अवैधरीत्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने बोगस ग्राहक पाठवून शहानिशा करुन छापा टाकण्यात आला.