खळबळजनक! एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी घराला लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 11:57 IST2022-04-23T11:49:58+5:302022-04-23T11:57:17+5:30
Crime News : एकाच कुटुंबातील 5 जणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला, त्यामध्ये सर्वांचा मृत्यू झाला.

खळबळजनक! एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी घराला लावली आग
नवी दिल्ली - प्रयागराजमधील (Prayagraj) गंगापार (Gangapar) येथे एक भयंकर घटना उघडकीस आली. थरवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवराजपूर गावात एकाच कुटुंबातील 5 जणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला, त्यामध्ये सर्वांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी या घटनेनंतर घराला आग ही लावण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, थरवाई पोलीस स्टेशन हद्दीतील खेवराजपूर गावात शुक्रवारी रात्री एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली याच दरम्यान एका 5 वर्षाच्या मुलीवरही हल्ला झाला आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 5 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. तिला प्रयागराज येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रयागराजचे जिल्हा दंडाधिकारी संजय खत्री आणि एसएसपी प्रयागराज अजय कुमार घटनास्थळी पोहोचले आहेत.
स्निफर डॉग आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही घटनेच्या तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जण घरात झोपले होते. त्याचबरोबर घरातून अचानक धूरही निघत असल्याचे आढळून आले आहे. राज कुमार, कुसुम देवी, मनीषा कुमारी, सविता, मिनाक्षी अशी मृतांची नावं आहेत. सुरुवातीच्या तपासावरून असे दिसते आहे की, दरोडेखोरांनी ही घटना लुटण्याच्या उद्देशाने केली आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी घराला आग लावल्याचे समजते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.