Crime News: महिलेचे अश्लील फोटो होत होते व्हायरल, तपासातून सत्य समोर आलं तेव्हा बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 04:19 PM2022-01-14T16:19:48+5:302022-01-14T16:22:19+5:30

Crime News: पोलिसांनी एका व्यक्तीला महिलेचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा दुसरा तिसरा कुणी नसून त्या महिलेचा पती आहे.

Crime News: Pornographic photos of a woman were going viral | Crime News: महिलेचे अश्लील फोटो होत होते व्हायरल, तपासातून सत्य समोर आलं तेव्हा बसला धक्का

Crime News: महिलेचे अश्लील फोटो होत होते व्हायरल, तपासातून सत्य समोर आलं तेव्हा बसला धक्का

googlenewsNext

भोपाळ - मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ह्यात एक धक्का देणारी घटना समोर आली आहे. जिथे पोलिसांनी एका व्यक्तीला महिलेचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा दुसरा तिसरा कुणी नसून त्या महिलेचा पती आहे. तो नाव बदलून हे विकृत कृत्य करत होता.

या प्रकरणी पोलीस अधिकारी सुशील पटेल यांनी सांगितले की, टिमरनी पोलीस ठाण्यामध्ये पीडित महिलेने तक्रार दाखल केली होती. कुणीतरी तरुण तिचे फोटो एडिट करून अश्लील पद्धतीने सोशल मीडियावर पोस्ट करत आहे, असा आरोप या महिलेने तक्रारीत केला होता. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने माहिती गोळा करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीचं नाव फिरोज असं असून, त्याने पोलिसांना सांगितले की, त्याने सोनू सिंह नावाने खोटं इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून अश्लील फोटो शेअर केले होते.

आरोपी तरुण सिराली येथील फिरोज खान हा असून, तो तक्रारदार महिलेचा पती आहे. सदर महिला आणि तिचा पती फिरोज खान यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे ही महिला सध्या माहेरीच राहत आहे. पोलिसांनी आरोपी फिरोज याला अटक करून न्यायालयात हजर केले. तिथून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

या घटनेतील आरोपीला अटक झाल्यानंतर प्रत्येकाला धक्का बसला आहे. सायबर सेलने अत्यंत सावधानतेने या प्रकरणाचा तपास केला आणि सर्व्हिलान्स आणि आयपी अॅड्रेसच्या मदतीने आरोपीला पकडण्यात यश मिळवले. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे. 

Web Title: Crime News: Pornographic photos of a woman were going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.