Crime News: जळगावात दोन लाॅजवर पोलिसांची धाड; १२ जोडपी पकडली
By सुनील पाटील | Updated: August 18, 2022 21:21 IST2022-08-18T21:21:11+5:302022-08-18T21:21:45+5:30
Crime News: एमआयडीसीतील दोन लाॅजवर गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली. त्यात १२ मुलामुलींना पकडण्यात आले आहे. लाॅज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime News: जळगावात दोन लाॅजवर पोलिसांची धाड; १२ जोडपी पकडली
- सुनील पाटील
जळगाव : एमआयडीसीतील दोन लाॅजवर गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली. त्यात १२ मुलामुलींना पकडण्यात आले आहे. लाॅज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन लाॅजवर अनैतिक प्रकार सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने धाड टाकली असता एका ठिकाणी चार मुली व चार मुले तर दुसऱ्या ठिकाणी ८ मुली व ८ मुलं मिळून आली. यात काही मुली वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत तर काही मुली परप्रांतीय आहेत. त्या जळगावात स्थायिक झालेल्या आहेत. एका ठिकाणी दलालाच्या माध्यमातून मुली पुरविण्यात आल्याचे उघड झाले आहे. आपण आपल्या मर्जीने आल्याचे या मुलींनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.