उत्तर प्रदेशात एका प्लॉटमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोच्या घरच्यांनी सुमारे ३ लाख रुपयांना एक प्लॉट विकत घेतला होता. काही वर्षांतच त्या प्लॉटची किंमत झपाट्याने वाढून ३० लाखांपर्यंत पोहोचली. हे समजताच जावयाने सासूकडे पैशांचा हिस्सा मागू लागला. मात्र, सासूने तो प्लॉट देण्यास नकार दिला. त्यानंतर जावयाने सतत धमक्या देण्यास सुरुवात केली. या धमक्यांना कंटाळून बायको आणि सासूने मिळून अखेर जावयाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॉटसाठी जावयाने सासूचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून तो सासूकडे प्लॉटची मागणी करत होता. या धमक्यांना सासू आणि पत्नी वैतागली होती. सासू आणि पत्नीने मिळून जावयाला संपवण्याचा कट रचला.
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
एक दिवस रात्री नेहमी प्रमाणे जावई सोनू याला पत्नीने दूध प्यायला दिले. या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या, काही तासांनी सोनू याला गाढ झोप लागल्यानंतर सासू आणि पत्नीने मिळून एका दोरीने त्याचा गळा आवळला. यानंतर त्याचा मृतदेह वरती टांगला आणि त्याने आत्महत्या केल्याचा दावा केला. पोलिसांनी मृतदेह पाहिल्यानंतर घातपाताचा संशय व्यक्त केला.
पोलिसांनी सासू आणि पत्नीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच पत्नीने गुन्हा कबूल केला आणि सर्व घटना पोलिसांनी सांगितली. हे सर्व ऐकून पोलिसही थक्क झाले. एका प्लॉटच्या पैशांसाठी जावयाची हत्या केल्याचे समोर आले.
सासूला जावई पैसे संपवेल याची होती भीती
सोनू सतत त्याच्या सासूशी वाद घालत होता. पत्नी आणि सासू दोघेही त्याला मालमत्तेपासून दूर ठेवण्याचा कट रचत आहेत असे त्याला नेहमी वाटायचे. तसेच सासूला जावई सर्व पैसे संपवेल याची भीती होती. दरम्यान, त्याच्या सासूला भीती होती की सोनू जमीन विकेल किंवा बळकावेल. ही भीती हळूहळू द्वेषात आणि नंतर खूनात रूपांतरित झाली.
पैशामुळे आख्ख कुटुंब संपलं
सोनूसारख्या आनंदी माणसाला त्याच्याच पत्नीने मारले यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत नाही. शेजारी म्हणतात, "सोनू एक चांगला माणूस होता, पण पैशाने सर्व काही उद्ध्वस्त केले. आता फक्त जमीन उरली आहे, माणसे नाहीत." अनेक गावकरी म्हणतात की गेल्या काही वर्षांत या भागातील जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ज्यांनी जमीन घेतली आहे ते श्रीमंत झाले आहेत, पण त्यासोबतच लोभ आणि संघर्षही वाढला आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a plot worth 3 lakhs became 30 lakhs, leading to murder. The son-in-law demanded a share, but the wife and mother-in-law killed him after he threatened to release a compromising video.
Web Summary : उत्तर प्रदेश में 3 लाख का प्लॉट 30 लाख का होने पर हत्या। दामाद ने हिस्सा मांगा, पत्नी और सास ने वीडियो जारी करने की धमकी के बाद उसे मार डाला।