खळबळजनक! एकतर्फी प्रेमात 'तो' झाला वेडा; लग्न ठरताच तरुणीच्या आईवर झाडली गोळी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 20:21 IST2021-10-31T20:17:07+5:302021-10-31T20:21:38+5:30
Crime News : लग्नाबाबत समजताच तरुण संतापला आणि त्याने रागाच्या भरात तरुणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. तरुणीची आई आणि इतर नातेवाईकांवर गोळ्या झाडल्या.

खळबळजनक! एकतर्फी प्रेमात 'तो' झाला वेडा; लग्न ठरताच तरुणीच्या आईवर झाडली गोळी अन्...
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. तरुणीचं लग्न ठरलं म्हणून त्याने तिच्या आईवरच गोळी झाडली आहे. गेल्या दीड वर्षांपासून तरुण मुलीसोबत बोलत होता. त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं. मात्र कुटुंबीयांनी तिचं दुसऱ्या एका तरुणाशी लग्न ठरवलं. लग्नाबाबत समजताच तरुण संतापला आणि त्याने रागाच्या भरात तरुणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. तरुणीची आई आणि इतर नातेवाईकांवर गोळ्या झाडल्या.
तरुणीच्या आई आणि नातेवाईकांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांत देखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आगश्या असं या तरुणाचं नाव असून त्याचं तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून प्रेम होतं. पण तिचं लग्न ठरल्याचं समजताच त्याने तरुणीच्या घरच्या लोकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेने परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
'तिचं' लग्न ठरलं म्हणून 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं
आरोपी संतोश आगश्या याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद नगर पोलीस ठाणे परिसरातील श्रीनगरमध्ये एका तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं. त्यामुळे त्याने तरुणीच्या घरी जाऊन गोळीबार केला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस अधिकारी इंद्रमणी पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.