Crime News: पनवेलमध्ये आपसातील किरकोळ वादातून एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 14:02 IST2021-12-07T14:01:04+5:302021-12-07T14:02:13+5:30
Crime News: तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोट येथे जमीनीच्या वादातून ५० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. निवृत्ती बाबू पाटील असे मृत इसमाचे नाव असून या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: पनवेलमध्ये आपसातील किरकोळ वादातून एकाची हत्या
पनवेल - तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोट येथे जमीनीच्या वादातून ५० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. निवृत्ती बाबू पाटील असे मृत इसमाचे नाव असून या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (६ डिसेंबर) घोट येथील सुनंदा कोळेकर व त्यांचा मयत भाऊ निवृत्ती बाबू पाटील व त्याचा मुलगा निरंजन असे गावातील पिंपळपाडा येथील चाळीच्या मागील बाजूस बोरवेलच्या पाईपलाईनचे काम करत होते. यावेळी मोठा भाऊ बाळाराम बाबू पाटील व त्यांची दोन मुले यांनी त्याठिकाणी बोरवेलच्या पाईप लाईनचे काम करण्यास विरोध केला. त्यानंतर झालेल्या वादातून निवृत्ती पाटील यांच्या डोक्यावर व गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी बाळाराम बाबू पाटील, नितीन बाळाराम पाटील, मनोज बाळाराम पाटील यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मनोज पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोघेजण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.