शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीसोबत सेल्फी काढणं पडलं महागात, नवविवाहितेचा मृत्यू पण माहेरच्यांनी केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 16:38 IST

Crime News : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बंदुकीसोबत सेल्फी काढणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. तिला आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या माहेरच्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. हुंड्यासाठी आपल्या मुलीचा प्रचंड छळ करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच दोन लाखांसाठी सासरची म़ंडळी तिला खूप त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

तरुणीचे वडील राकेश कुमार यांनी मुलीचा पती आकाश आणि सासू-सासरे यांच्या विरोधात हुंड्यासाठी 2 लाख रुपये मागून अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश गुप्ता याचं लग्न राधिका हिच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी झालं होतं. साधारण 2 वाजेदरम्यान राधिका बंदुकीसह सेल्फी घेत असताना अचानक गोळी झाडली गेली आणि यात राधिकाचा मृत्यू झाला. यानंतर तातडीने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. बंदुकीची गोळी राधिकाच्या गळ्याच्या आरपार गेली. 

पोलिसांनाही या प्रकरणाची सूचना देण्यात आली. अधिक तपासासाठी पोलिसांनी राधिकाचा मोबाईल जप्त केला आहे. यानंतर राधिकाचे माहेरील मंडळीदेखील दाखल झाली. त्यांनी राधिकाच्या सासरच्या मंडळींवर तिच्या हत्येचा आरोप केला आहे. राधिकाच्या सासरची मंडळी 2 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तिच्यावर अत्याचार करीत होते. त्यामुळे त्यांनीच गोळी घालून तिची हत्या केल्याचा आरोप राधिकाच्या वडिलांनी केला आहे. पती-पत्नी बंदूक हातात धरून सेल्फी घेत असताना ही घटना घडली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

संतापजनक! जीन्स घालते म्हणून काकाने आणि आजोबांनी केली तरुणीची हत्या; अशी झाली पोलखोल

उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. 17 वर्षीय तरुणीला तिच्या काकांनी आणि आजोबांनी जीन्स घालून नको असं वारंवार सांगितलं होतं. मात्र तिने त्याची ही गोष्ट ऐकण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या या दोघांनी टोकाचं पाऊल उचलत तिची हत्या केली आहे. मुलीचे वडील लुधियानात नोकरी करत असल्यामुळे ही मुलगी आपल्या आईवडिलांसोबत शहरात राहत होती. मात्र सध्या कोरोनाकाळात हे कुटुंब गावी आलं होतं. शहराप्रमाणे गावात जीन्स घालून फिरण्याला मुलीच्या काकाचा विरोध होता. यावरून त्या मुलीमध्ये आणि काकामध्ये अऩेकदा वादही होत असे. हाच राग मनात ठेऊन काकाने आणि मुलीच्या आजोबांनी तिला बेदम मारहाण केली. दोघांनी केलेल्या मारहाणीदरम्यान भिंतीवर डोकं आपटून या मुलीचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस