पती झाला हैवान! लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यांत पत्नीचा काढला काटा; हुंड्यासाठी केलं भयंकर कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 20:37 IST2022-05-19T20:30:56+5:302022-05-19T20:37:43+5:30
Crime News : डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केल्यानंतर उपचारासाठी आणलेल्या सासरच्या लोकांनी मृतदेह टाकून पळ काढला. पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

फोटो - news18 hindi
नवी दिल्ली - हुंड्यासाठी नवविवाहितेची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हुंड्यात 5 लाख रुपये दिले नाहीत म्हणून नवविवाहितेची हत्या करण्यात आली आहे. महिलेचं अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केल्यानंतर उपचारासाठी आणलेल्या सासरच्या लोकांनी मृतदेह टाकून पळ काढला. पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. माहेरच्या मंडळींनी 8 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
तीन महिन्यांपूर्वी वाल्मिकीनगर येथील गणौली येथील प्रियंकाचा विवाह चौतरवा येथील नादवाच्या अनिल गुप्ता याच्याशी झाला होता. लग्नापासूनच हुंड्याच्या नावाखाली पाच लाख रुपयांची मागणी केली जात होती. याच दरम्यान, प्रियंकावरही अत्याचार होत होते. सासरच्यांनी गळा आवळून हत्या केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
5 फेब्रुवारी रोजी झालं होतं लग्न
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारीला प्रियंका आणि अनिलने विधीवत सप्तपदी घेतले. हुंडा म्हणून त्याच्याकडून चारचाकी वाहनांची मागणी केली जात होती. बुधवारी रात्री अचानक त्यांना जावयाकडून माहिती मिळाली की, तुमच्या मुलीची तब्येत बिघडली असून तिला उपचारासाठी आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे. पण खरंतर मुलगी त्याचवेळी मृतावस्थेत होती.
प्रियंकाचे वडील भोला साह यांनी सांगितलं की, जावयाने आपल्या मुलीला फोन करून सांगितले होते. जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांना प्रियंका कुमारीच्या मानेवर खुणा दिसल्या, त्यावरून तिचा गळा आवळून खून झाल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी जावयासह आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांनी जावयाला अटक केली असून चौकशी सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.