नात्याला काळीमा! कर्जाच्या वादातून भाच्यानेच केली वृद्धेची हत्या, नेमकं काय घडलं? 

By मनीषा म्हात्रे | Updated: August 24, 2022 16:56 IST2022-08-24T16:54:28+5:302022-08-24T16:56:15+5:30

Crime News : भायखळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अन्थोनी फर्नाडीसला अटक केली आहे.

Crime News Nephew killed an old woman due to loan dispute in mumbai | नात्याला काळीमा! कर्जाच्या वादातून भाच्यानेच केली वृद्धेची हत्या, नेमकं काय घडलं? 

नात्याला काळीमा! कर्जाच्या वादातून भाच्यानेच केली वृद्धेची हत्या, नेमकं काय घडलं? 

मुंबई - कर्जाच्या वादातून भाच्याने वृद्धेला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अन्थोनी फर्नाडीसला अटक केली आहे.

घोडपदेव परिसरात राहणाऱ्या फर्नाडिसची पत्नी अर्चना (३६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. या मारहाणीत  संतान बस्तॅव फर्नांडीस( ६५) यांचा मृत्यू झाला आहे. संतान यांना कमरेच्या व मणक्याचे त्रासामुळे चालता येत नव्हते. राहत्या घरावर अन्थोनीच्या भावाला कर्ज घेऊन का दिले? ते कोण फेडणार? या रागातून अन्थोनीने संतान यांना बेदम मारहाण केली. 

अर्चना यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील त्याच्याकडून मारहाण सुरू होती. या मारहाणीत त्या बेशुद्ध होताच त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्यांना दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अर्चना यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा, वरील घटनाक्रम समोर आला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे. 
 

Web Title: Crime News Nephew killed an old woman due to loan dispute in mumbai