Crime News: ‘माझा मृत्यू हे तुला लग्नाचं गिफ्ट,’ व्हॉट्सअॅ वर व्हिडीओ स्टेटस ठेवत प्रियकराची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 15:39 IST2022-04-24T15:38:36+5:302022-04-24T15:39:22+5:30
Crime News: छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकतर्फी प्रेमामधून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना पाररास येथील आहे.

Crime News: ‘माझा मृत्यू हे तुला लग्नाचं गिफ्ट,’ व्हॉट्सअॅ वर व्हिडीओ स्टेटस ठेवत प्रियकराची आत्महत्या
रायपूर - छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकतर्फी प्रेमामधून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना पाररास येथील आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाने खोलीमध्ये लिहिले की, त्याचा मृत्यू हा त्याच्याकडून प्रेयसीसाठी लग्नाचं गिफ्ट आहे. तसेच या तरुणाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ तयार केला आणि तो व्हॉट्सअॅप स्टेटवर अपलोड केला.
पोलिसांनी सांगितले की, या तरुणाने भिंतीवर लिहिले की, माझा मृत्यू तुझ्यासाठी लग्नाचं गिफ्ट, आय लव्ह यू, त्यानंतर या तरुणाने गळ्यात फास घालत तो व्हॉट्सअॅपवर अपलोड केला. त्यानंतर या तरुणाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा तरुण तरुणीवर एकतर्फी प्रेम करायचा. तर त्या तरुणीचा विवाह होत होता. त्यामुळे सदर तरुण हा खूप दु:खी होता.
बालोदचे डीएसपी प्रतीक चतुर्वेदी यांनी सांगितले की, या तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच व्हिडीओचीही तपासणी सुरू आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान, एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.