हत्येचा थरार! एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या, विहिरीत सापडले मृतदेह; मृतांमध्ये गर्भवती महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 15:31 IST2022-05-28T15:27:04+5:302022-05-28T15:31:38+5:30
Crime News : तीन महिला आणि दोन मुलांची हत्या करण्यात आली. विहिरीतून एकूण 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

हत्येचा थरार! एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या, विहिरीत सापडले मृतदेह; मृतांमध्ये गर्भवती महिला
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जयपूरच्या दुदू परिसरात तीन महिला आणि दोन मुलांची हत्या करण्यात आली. विहिरीतून एकूण 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या तीनपैकी दोन महिला गर्भवती होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, सासरच्या लोकांनी हुंड्याच्या हव्यासापोटी तीन महिला आणि दोन मुलांची हत्या केली आहे. ज्या महिलांचे (सर्व बहिणी) मृतदेह सापडले त्यात कालुदेवी आणि तिच्या दोन बहिणींचा समावेश आहे. कालू देवी यांच्या दोन मुलांचे (एक चार वर्ष आणि दुसरे 27 दिवस) मृतदेहही सापडले आहेत. त्याचवेळी तिच्या दोन बहिणी ममता देवी आणि कमलेश यांचेही मृतदेह शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर याच विहिरीतून सापडले आहेत.
कालू देवीच्या दोन्ही बहिणी गरोदर होत्या आणि त्या कधीही मुलाला जन्म देऊ शकणार होत्या. एकाच वेळी पाच मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवार संध्याकाळपासून 3 सख्ख्या बहिणींसह त्यांची दोन मुलेही बेपत्ता होती.
रिपोर्टनुसार, पंधरा दिवसांपूर्वी सर्वात मोठ्या बहिणीला मारहाण करून तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती. ती काही वेळा दिवसांपूर्वीच रुग्णालयातून परतली होती आणि सासरच्यांकडून सतत हुंड्याची मागणी होत होती. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.