शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! ...आता मी राखी कोणाला बांधू?,बहिणीचा आक्रोश; रक्षाबंधनाआधीच गमावले 2 सख्खे भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 13:11 IST

Crime News : रक्षाबंधनाच्या एक दिवस आधीच एका बहिणीने आपले दोन भाऊ गमावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मामानेच आपल्या दोन चिमुकल्या भाचांची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधीच एका बहिणीने आपले दोन भाऊ गमावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मामानेच आपल्या दोन चिमुकल्या भाचांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. ज्या भावाला इतकी वर्ष राखी बांधली त्यानेच घात केला आणि बहिणीच्या दोन चिमुकल्या मुलांची हत्या केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसारा गावात राहणाऱ्या रामकिशोर यांना दोन मुलं आहेत. सात वर्षांचा कृष्णा आणि पाच वर्षांचा दिव्यांश एका खासगी शाळेत शिकत होते. रामकिशोर यांची पत्नी कृष्णावतीचा भाऊ महेंद्र प्रताप हा दोन महिन्यांपासून आपल्या बहिणीकडेच राहत होता. तो आपल्या भाच्यांना शाळेत सोडायचा. घटनेच्या दिवशी देखील तो भाच्यांना शाळेत घेऊन जायला निघाला आणि त्यानंतर परत आलाच नाही. 

रामकिशोर यांनी आपल्या मेहुण्याविरोधात मुलांचं अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता. दोन मुलांचा मृतदेह कालव्यात आढळून आला आहे. पोलिसांनी कुटुंबियांना याबाबत सांगताच त्यांना मोठा धक्का बसला. या मुलांना एक मोठी बहीण देखील आहे. मुलं घरी परत न आल्याने ती आपले भाऊ घरी सुरक्षित परत यावेत म्हणून सतत प्रार्थना करत होती. पण तसं झालं नाही. 

मुलांच्या आईने कधी विचारही केला नव्हता की ज्या भावाला गेल्या कित्येक वर्ष राखी बांधली तो आपल्याच मुलाचा असा प्रकारे जीव घेईल. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रक्षाबंधनाच्या आधीच अशी घटना घडल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी