Crime News: इन्स्टाग्रामवर सुत जुळले! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली दोन मुलांची आई; इकडे पतीने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 19:57 IST2023-02-03T19:57:43+5:302023-02-03T19:57:56+5:30
गेल्या आठवड्यापासून त्याची पत्नी आणि एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेतला असता ती पळून गेल्याचे समजले.

Crime News: इन्स्टाग्रामवर सुत जुळले! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली दोन मुलांची आई; इकडे पतीने...
आसामच्या जोरहाट जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवरील बॉयफ्रेंडसोबत दोन मुलांची आई असलेली महिला पळून गेली. यामुळे मानसिक धक्का बसलेल्या पतीने आत्महत्या केली आहे. गेल्या आठवड्यापासून त्याची पत्नी आणि एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेतला असता ती पळून गेल्याचे समजल्याने पतीने हे पाऊल उचलले.
मोहम्मद शब्बीर हुसैन असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. शब्बीरची पत्नी इन्स्टाच्या माध्यमातून एका व्यक्तीला भेटली होती. तिच्यासोबत तिचे प्रेमसंबंध सुरु होते. महिलेला आणि तिच्या मुलीचे कोणीतरी अपहरण केले असावे असे शब्बीरच्या कुटुंबाला वाटत होते. कारण तिला धोका असल्याचा तिने काही दिवसांपूर्वी फोन केला होता.
यामुळे शब्बीरने पोलिसांत याची तक्रार केली होती. पोलिसांनी यावरून बेपत्ता महिलेचा शोध सुरु केला होता. तेव्हा त्यांना ही महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे समजले. परंतू, घराच्यांसमोर तिने तिचे अपहरण झाल्याचा बनाव रचला होता. यामुळे पोलिसही बुचकळ्यात पडले होते. अखेर पोलिसांनी खरी परिस्थिती शब्बीरला सांगितली. यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली.