Crime News: ‘आईने रात्री चिकन खाल्लं, मग बाबांचं डोकं कापून मंदिरात ठेवलं’, मुलाने केला धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 21:54 IST2022-03-12T21:53:18+5:302022-03-12T21:54:19+5:30
Crime News: त्रिपुरामधील खोवई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका लहान मुलाने त्याच्य आईने केलेल्या भयंकर कृत्याचा उलगडा केली आहे.

Crime News: ‘आईने रात्री चिकन खाल्लं, मग बाबांचं डोकं कापून मंदिरात ठेवलं’, मुलाने केला धक्कादायक दावा
आगरतळा - त्रिपुरामधील खोवई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका लहान मुलाने त्याच्य आईने केलेल्या भयंकर कृत्याचा उलगडा केली आहे. या महिलेच्या मुलाने आईवर आरोप केला की, त्याच्या आईने त्याच्या वडिलांचं शीर कापून ते एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले. त्यानंतर ते जवळच्या मंदिरात नेऊन ठेवले. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शनिवारी सकाळी हा गुन्हा घडला. खोवई जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक भूपेंद्र चक्रवर्ती यांनी सांगितले की, या महिलेच्या मोठ्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या वडिलांचं वय हे ५० वर्षे होतं. या महिलेने नेमक्या कुठल्या कारणामुळे पतीची हत्या केली हे समजू शकलेले नाही. मात्र तिच्या मोठ्या मुलाने सांगितले की, त्याची आई गेल्या काही दिवसांपासून मानसिकदृष्टया त्रस्त होती. तसेच शहरातील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या मुलाने पोलिसांना सांगितले की, त्याची आई पूर्णपणे शाकाहारी आहे. मात्र त्या दिवशी तिने चिकन खाल्ले. जेवण झाल्यावर आम्ही झोपायला गेलो. मात्र जेव्हा मध्येच आम्हाला जाग आली तेव्हा बाबांचे डोके धडावेगळे झालेले दिसले. तसेच आई एक धारदार हत्यात घेऊन उभी होती. त्यानंतर तिने खूप आरडाओरडा केला. तसेच बाबांचे डोके मंदिरात नेऊन ठेवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर महिलेने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले होते. जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या महिलेला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, त्यांना घटनास्थळावरून एक मृतदेहही सापडला, पुढील तपास सुरू आहे.