शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'त्याने' 20 वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला; पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 15:02 IST

Crime News : तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात य़ेत आहे. पोलिसांच्या टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना घडली आहे. एका तरुणाने तब्बल 20 वर्षांनंतर आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला आहे. पोलीस तपासात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील अहरोडा गावात 15 जुलै रोजी मांगेराम नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच आरोपींनी मृतदेह हा पेट्रोल टाकून जाळून दिला होता. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांना या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या गोविंदा याला सोमवारी अटक करण्यात यश आलं. त्याच्याकडून काडतूसं जमा करण्यात आली आहेत. तसेच तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात य़ेत आहे. पोलिसांच्या टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने मोठा खुलासा केला आहे. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेल्या 27 वर्षीय गोविंदाने 20 वर्षांनंतर आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला आहे. 

गोविंदाचे वडील अजयपाल यांची 20 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. पोलीस अधिकारी अतुल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाने चौकशीदरम्यान पोलिसांना 20 वर्षांपूर्वी वडील अजयपाल यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी मांगेरामला शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. याचाच बदला घेण्यासाठी गोविंदाने आपल्या काही साथीदारांसोबत हत्येचा कट रचला आणि मांगेरामची हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आता गोविंदाला अटक केली असून ते अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सासरच्यांनी जबरदस्तीने विष पाजलं, मारलं; गुप्तांगात मिरची टाकण्याचा प्रयत्न, तरुणीच्या 'त्या' Video ने खळबळ 

महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हुंड्यासाठी एका विवाहितेचा प्रचंड छळ करून तिला विष पाजल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सासरच्यांनी जबरदस्तीने विष पाजलं, बेदम मारलं आणि गुप्तांगात मिरची टाकण्याचा प्रयत्न केला असं  तरुणीने म्हटलं आहे. मृत्यूपूर्वी तिने केलेल्या Video मधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. अडीच महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात ही भयंकर घटना आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस