विकृतीचा कळस! अल्पवयीन मुलाने तरुणीला फरफटत झुडपात नेलं; दगडाने मारून बलात्काराचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 18:10 IST2021-10-28T18:04:37+5:302021-10-28T18:10:28+5:30
Crime News : अल्पवयीन मुलाने तरुणीला रस्त्यावरुन ओढत जवळच्या झुडपात नेलं होतं. यानंतर त्याने तिचे हात दुपट्ट्याने बांधण्याचा प्रयत्न केला.

विकृतीचा कळस! अल्पवयीन मुलाने तरुणीला फरफटत झुडपात नेलं; दगडाने मारून बलात्काराचा प्रयत्न
नवी दिल्ली - केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने विकृतीचा कळस गाठला आहे. 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 21 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी कॉम्प्यूटर क्लाससाठी निघाली असताना मुलाने तिचा पाठलाग केला.
अल्पवयीन मुलाने तरुणीला रस्त्यावरुन ओढत जवळच्या झुडपात नेलं होतं. यानंतर त्याने तिचे हात दुपट्ट्याने बांधण्याचा प्रयत्न केला. तसेच दगडाने डोक्यावर वार करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तिला जीवे मारण्यासाठी त्याने हे केलं. या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नसते त्यामुळे घटना घडली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीने आरोपीपासून सुटका करुन घेत पळ काढला आणि घर गाठलं.
तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू
पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, मुलाला पकडण्यात आता पोलिसांना यश आलं आहे. तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलाने केलेल्या कृत्याने पोलीस देखील हैराण झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.