शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! व्यावसायिक पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीनेही कापून घेतला स्वतःचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 10:46 IST

Interior designer amit bansal committed suicide : व्यापाऱ्याने स्वतःच्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या आत्महत्येबाबत समजताच त्याच्या पत्नीने देखील स्वतःचा गळा कापून घेतला.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भयंकर घटनेने मेरठ हादरले आहे. एका लोकप्रिय, हायप्रोफाईल व्यापाऱ्याने स्वतःच्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या आत्महत्येबाबत समजताच त्याच्या पत्नीने देखील स्वतःचा गळा कापून घेतला. पत्नीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये राहणारे इंटेरियर डेकोरेटर अमित बन्सल हे शहरातील अत्यंत लोकप्रिय इंटिरिअर डिझायनर आणि पीओपीचे व्यापारी होते. त्याचं स्वत:च एक मोठं ऑफिस देखील होतं. नेहमीप्रमाणे अमित त्यांच्या कार्यालयात आले. बन्सल हे हाय प्रोफाईल कुटुंबातील असून त्यांचे काही नातेवाईक वरिष्ठ अधिकारी आहेत. नेहमीप्रमाणे कार्यालयात आलेल्या अमित बन्सल यांनी तिथे गळफास लावून आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कार्यालयात खळबळ उडाली.

कुटुंबीयांना खूप मोठा मानसिक धक्का

अमित यांच्यापाठोपाठ काही वेळाने त्यांची पत्नी पिंकी कार्यालयात आली. पतीने गळफास घेतल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच पेपर कटरने स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पिंकी यांना कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अमित बन्सल यांनी आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. 

पाणावलेले डोळे आणि थरथरत्या हाताने दिला मुलाला मुखाग्नी

अमित यांचे वडील रामकिशन बन्सल यांनी पाणावलेले डोळे आणि थरथरत्या हाताने आपल्या मुलाला मुखाग्नी दिला आहे. अमित यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अमित यांच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. अमित तणावात असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतDeathमृत्यूPoliceपोलिस