शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नवरी जोमात, नवरदेव कोमात! अवघ्या 7 दिवसांचं लग्न, संबंधांना नकार; दागिने घेऊन नववधू पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 13:06 IST

Crime News : तीन लाख रोख, दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन ती फरार झाली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर आठवड्याभरातच नववधू पैसे आणि दागिने घेऊन फरार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तीन लाख रोख, दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन ती फरार झाली आहे. यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलीस लुटारू वधू आणि तिच्या टोळीचा शोध घेत आहेत. यानंतर नवरदेवाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणीसह दलालांविरुद्ध फसवणूक आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे सर्वजण फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या बाणगंगा पोलीस ठाणे हद्दीतील रेवती रेंजमधील रहिवासी विजया पडना यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा राहुलची ओळख काजल उर्फ ​​ज्योती आणि राधेश्याम यांच्याशी झाली होती. हे लोक दलालांच्या मदतीने लग्न लावायचे. या टोळीने आपल्या मुलाला जाळ्यात अडकवलं. यानंतर पोलिसांनी विजया पडना यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

राहुल आणि ललिता यांचे लग्न 10 जुलैला झाले होते. ललिता ही विधवा आहे, असे सांगून तिचे लग्न लावून देण्यात आले होते. लग्नाआधी छत्तीसगडच्या भिलाईमध्ये लग्नाआधी साखरपुडा आणि इतर विधी पार पडले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वधूने मासिक पाळीचे कारण देऊन शारीरिक संबंधाला नकार दिला. मात्र, यानंतर फक्त सात दिवसातच ती तरुणी फरार झाली. यानंतर नवरदेवाच्या कुटुंबाने दलालाकडे धाव घेतली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी छत्तीसगड येथेही एक टीम पाठवली आहे. ही एक मोठी टोळी असून त्यात अनेक लोक सामील असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी