Crime News: उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नशेखोराचा धिंगाणा, डॉक्टरां सोबतही गैरवर्तन
By सदानंद नाईक | Updated: October 12, 2022 18:01 IST2022-10-12T18:00:42+5:302022-10-12T18:01:03+5:30
Crime News: मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पती व पत्नीच्या भांडणाची तक्रार घेत नसल्याच्या रागातून एका नशेखोराने धिंगाणा घातला. त्याची वैधकीय तपासणीसाठी पोलीस मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता, डॉक्टर सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार केला.

Crime News: उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नशेखोराचा धिंगाणा, डॉक्टरां सोबतही गैरवर्तन
- सदानंद नाईक
उल्हासनगर - मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पती व पत्नीच्या भांडणाची तक्रार घेत नसल्याच्या रागातून एका नशेखोराने धिंगाणा घातला. त्याची वैधकीय तपासणीसाठी पोलीस मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता, डॉक्टर सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरातील प्रसिद्ध ढोली नास्तावाला या ठिकाणी मंगळवारी दुपारी दुर्गाप्रसाद रामविलास शुक्ला यांचे पत्नी सोबत भांडण झाले. त्यानंतर तक्रार देण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शुक्ला आला. दारूच्या नशेत असलेल्या शुक्ला याने तक्रार घेत नसल्याच्या रागातून पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला. यावेळी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस त्याला घेवून मध्यवर्ती रुग्णालयात वैधकीय तपासणी साठी गेले. रुग्णालयात नशेखोर शुक्ला याने कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर सोबत गैरवर्तन केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी दुर्गाप्रसाद शुक्ला याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.