Crime News: भल्या पहाटे पती गर्लफ्रेंडच्या घरी गेला; मागावर पत्नी आली, चप्पल बेडखाली दिसली अन् फसला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 15:53 IST2021-11-30T15:53:10+5:302021-11-30T15:53:46+5:30
Husband Affair caught in Noida: दनकौर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर हा तरुण राहतो. त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याची गर्लफ्रेंड राहते. ही गर्लफ्रेंड एका राजकीय पक्षाची सक्रिय कार्यकर्ता आहे.

Crime News: भल्या पहाटे पती गर्लफ्रेंडच्या घरी गेला; मागावर पत्नी आली, चप्पल बेडखाली दिसली अन् फसला...
नोएडाच्या दनकौरमध्ये विवाहित असूनही बाहेर लफडी करणाऱ्यांची झोप उडविणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक तरुणाला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्याल तिच्या घरी जाणे चांगलेच महागात पडले आहे. त्याच्या मागोमाग पोहोचलेल्या पत्नीने त्याची चांगलीच धुलाई केली आहे. महिलेने आपल्या पतीवर विवाहित असताना दसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध ठेवणे आणि मारहाण करण्याचा आरोप करत दनकौर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दनकौर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर हा तरुण राहतो. त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याची गर्लफ्रेंड राहते. ही गर्लफ्रेंड एका राजकीय पक्षाची सक्रिय कार्यकर्ता आहे. सोमवारी पहाटे ४ वाजता हा तरुण गुपचूप पत्नीला कळू न देता गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता.
पत्नीला जेव्हा जाग आली तेव्हा पती घरी नसल्याचे तिच्या लक्षात आले. पतीचे लफडे तिच्या कानावर आले होते. यामुळे ती देखील गुपचूप पतीच्या गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचली. पत्नी आल्याचे पाहून पती बेडच्या खाली लपला. मात्र, चप्पल लपवायला विसरला. बेडखाली त्याची चप्पल तशीच पडलेली होती. पत्नीने बेडखालून पतीला ओढून बाहेर काढले आणि धु धु धुतले.
आरडाओरडा ऐकून आजुबाजुचे लोक जागे झाले. पहाटे पहाटे हा कसला गोंधळ ते पाहण्यासाठी ते जमा झाले. तर एक महिला एका पुरुषाला चोपत असल्याचे पाहिले. लोक येत असल्याचे पाहून पतीने तिच्या तावडीतून सुटत पलायन केले. महिलेसोबतचे लफडे पत्नीला माहिती आहे, अनेकदा तिने त्याबाबत आक्षेपही घेतला आहे. परंतू पती सुधरलेला नाही, असा आरोप तिने केला आहे.