शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : भिवंडीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 11:51 IST

आरोपी पतीचा आत्महत्येचा प्रयत्न.

भिवंडी : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीने सुऱ्याने पत्नीच्या पोटावर गळ्यावर वार तिची हत्या केली. तिच्यावर वार केल्यानंतर तिला जखमी अवस्थेत टाकून नजीकच्या वऱ्हाळ तलावात उडी मारून आरोपीनं आत्महत्या करणाचाही प्रयत्न केला. यानंतर संबंधित व्यक्तीला स्थानिकांनी पाण्यात उड्या मारून वाचवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आनंद वाघमारे असे पत्नीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर मीना वाघमारे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरातील मिलिंद नगर या भागात राहणारा आनंद वाघमारे याचे कामतघर परिसरात मटण विक्रीचे दुकान असून त्याची पत्नी मीना ही सुद्धा त्यास त्याच्या व्यवसायात मदत करीत असे. या दरम्यान मागील काही दिवसां पासून आनंद हा आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडण सुरू होते. मागील तीन दिवसांपासून हा वाद वाढत गेला. रविवारी सायंकाळी दोघे घराकडे जात असतानाच वऱ्हाळ देवी मंदिर परिसरात त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले.

यानंतर आनंद याने दारूच्या नशेत आपल्या सोबत असलेल्या पिशवीतील मटण कापण्याचा सुरा काढून पत्नी मीना हिच्या गळ्यावर पोटावर सपासप वार करून रक्तबंबाळ केले. याच अवस्थेत तिला तेथेच सोडून नजीकच्या वऱ्हाळ तलावात त्याने उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. तो पाण्यात गटांगळ्या खात असताना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आशिष जाधव, नितीन आरकडे आपल्या मित्रां सोबत त्या ठिकाणी येत कुंदन सकट, संतोष नींगोले या युवकांनी पाण्यात बुडणाऱ्या आरोपीचा जीव वाचवून त्याला बाहेर काढले. 

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मनीष पाटील, महिला पोलीस उप निरीक्षक सायली शिंदे, पोलीस कर्मचारी शरद गोसावी उमेश सांबरे, पंडित जाधव हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले. तसंच जखमी अवस्थेत पडलेल्या त्याच्या पत्नीला स्व इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता उपचार सुरु असताना पत्नी मीना हीचा मृत्यू झाला. दरम्यान शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करीत पती आनंद याला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी